Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

९४ हजार शाळा बंद, अडीच कोटी मुलांचा काढता पाय; शासकीय शिक्षणव्यवस्था विसर्जनाच्या मार्गावर?

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून चलनात आणणारे त्रिकूट पकडले, एक फरार; संगमनेरातही नोटा आल्याची शक्यता! पोलीस तपास सुरू
गुन्हेगारी

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून चलनात आणणारे त्रिकूट पकडले, एक फरार; संगमनेरातही नोटा आल्याची शक्यता! पोलीस तपास सुरू

लोकसभा निवडणुकीच्या काळात या नोटा बाजारात आल्याची शक्यता
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 29, 2024Updated:May 30, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. २९ मे

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या त्रिकूटाला पोलिसांनी पकडले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. शेजारच्याच सिन्नरमधील एका हॉटेलमध्ये संशयित आरोपींकडून तयार केल्या जात होत्या. संगमनेरमध्ये देखील या नोटा आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित अशोक अण्णा पगार (वय ४५ वर्ष, रा. मेंढी, ता. सिन्नर) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत लक्ष्मण कोल्हे (वय ३२ वर्ष, रा. वाशी, नवी मुंबई) याला नाशिकमधून व नंदकुमार तुकाराम मुरकुटे (वय ५२ वर्ष, रा. सिन्नर) याला सिन्नरमध्ये सापळा रचून अटक केली असून चौथा संशयित आरोपी भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे, सिन्नर) हा फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.

पोलिसांनी पकडलेला आरोपींनी फरार असलेल्या आरोपीसह सिन्नरच्या एका हॉटेलमध्ये पाचशे रुपयांच्या या बनावट नोटा एका प्रिंटरच्या साह्याने छापल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी आरोपींनी वापरलेले लॅपटॉप, कलर प्रिंटरसह अन्य काही वस्तू जप्त केल्या आहेत.

पकडलेल्या तिघाही संशयितांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालय पुढे नेले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक सुनील पवार पुढील तपास करत आहे.

असा लागला छडा …

बनावट नोटा तयार करण्याचे काम चौघे मित्र एकत्रित करत होते. त्यांच्यात भांडण झाल्याने हा प्रकार समोर आला. याबाबत गुन्हे शोध पथकाचे संदीप भुरे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व अन्य अधिकाऱ्यांना दिली. सुरुवातीला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नाशिकच्या कामटवाडे परिसरात बनावट नोटा बाजारात मूळ व्यवहारात आणण्यासाठी आलेल्या अशोक अण्णा पगार याला पकडले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य दोघांना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या ३० बनावट नोटांव्यतिरिक्त मोबाईल मोटरसायकल असा २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 11,279
नाशिक पोलीस सिन्नर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

९४ हजार शाळा बंद, अडीच कोटी मुलांचा काढता पाय; शासकीय शिक्षणव्यवस्था विसर्जनाच्या मार्गावर?

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

विशेष लेख | भाऊसाहेब चासकर स्पर्धेच्या नावाखाली आज आपण मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच आपण नाकारत आहोत.…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.