Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, अकस्मात नसून घातपातच! आरोपींवर कारवाईसाठी ग्रामस्थांचा पुणे-नाशिक मार्गावर रास्ता रोको
आंदोलन

सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, अकस्मात नसून घातपातच! आरोपींवर कारवाईसाठी ग्रामस्थांचा पुणे-नाशिक मार्गावर रास्ता रोको

कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2024Updated:30/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेरच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील वाहतूक तासभर धरली रोखून!

६ जून पर्यंत तपासासाठी दिली डेडलाइन, पुढचे आंदोलन पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर

बुधवार, दि. २९ मे

१७ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. हा अकस्मात मृत्यूचा प्रकार नसून घातपाताचा असल्याचा संशय ग्रामस्थांना असल्याने याप्रकरणी पुढे कोणताही तपास न झाल्याने, चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी यासाठी बुधवारी (दि. २९ मे) नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसातील टोल नाक्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

६ जून पर्यंत पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करत संबंधितांवर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत, दोन बालकांच्या मृत्युप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई झाली नाही तर पुढच्या आंदोलन पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर केले जाईल असा इशारा आंदोलकांच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला. आंदोलकांचा यावेळी पोलीस प्रशासनावर रोष दिसून आला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांनी आंदोलकांना चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

महामार्गावर टोल नाक्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.

ग्रामस्थांच्यावतीने यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांसह पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन चौकशीची करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत अनेकवेळा तालुका पोलीस स्टेशन व डीवायएसपी कार्यालयातील संबंधीत अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करूनही आश्वासनापलीकडे संबंधितांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला मंगळवार पर्यंतची मुदत देण्यात आली मात्र पोलिसांकडून कोणते कारवाई केली न गेल्याने बुधवारी टोल नाक्यावर ग्रामस्थांनी तासभर आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे टोल नाक्यावर महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, प्रमोद पावसे, विजय पावसे, गणेश दवंगे, सुरेश गडाख आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेले दोघे भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिकत होते. यातील प्रणव हा तिसरीत तर रितेश हा पाचवीत होता. यांच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे आई शेती करून या दोघांचा सांभाळ करत होती. मात्र मुलांच्या मृत्यू मागे वेगळेच कारणे असण्याची चर्चा सुरू असल्याने याप्रकरणी पोलीस यंत्रणेने बारकाईने चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 11,725
पोलीस रास्ता रोको संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.