Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी झालेल्या वन जमिन व्यवहारांची चौकशी करण्याची भाजपची मागणी
प्रशासन

औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी झालेल्या वन जमिन व्यवहारांची चौकशी करण्याची भाजपची मागणी

भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केली मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2024Updated:30/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. २९ मे 

संगमनेर तालुक्यात मागील काही वर्षात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी झालेल्या वन जमीनींच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, या जमीनींवर उद्योग उभारणी झाली नसल्यास या जमीनी तातडीने ताब्यात घ्याव्यात, जमीनी खरेदी करताना मुद्रांक शुल्कामध्ये घेतलेल्या सवलतींची पायमल्ली झाली असल्यास त्याची भरपाई संबंधीतांकडून वसूल करण्यात यावी अशा मागण्या एका निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने प्रांताधिकार्‍यांकडे बुधवारी करण्यात आल्या.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वनजमीनींच्या खरेदीविक्री व्यवहारातील अनागोंदी कारभाराबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत या वनजमीनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी न झाल्यास प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही या शिष्टमंडळाने दिला.

शिष्टमंडळात ॲड. श्रीराम गणपुले, अमोल खताळ, हरीश चकोर, वैभव लांडगे, दिपक भगत, सिताराम मोहरीकर, शरद गोर्डे, सुयोग गुंजाळ, सुरेश लांडगे, घनशाम भारस्कर, सोमनाथ बढे, संजय वडगे, हरीष वलवे, शामसुंदर जोशी, बुवाजी खेमनर, संजय वाकचौरे, रोहिदास गुंजाळ, गोपीचंद गुंजाळ, सतिष गोपाळे, रणजीत गायकवाड, नवनाथ कानकाटे, घनशाम भोसले, राहुल भोईर, संयज वाकचौरे, वरद बागुल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील कऱ्हे गावासह अन्य काही गावामध्ये औद्योगिकीकरणासाठी वनजमीनींची मोठ्या प्रमाणात खेरदी विक्री झाली. मात्र या जमीनींवर अद्यापही उद्योगाची उभारणी झालेली नाही. त्यामुळे शासन नियमांची मोठी पायमल्ली झाली असून, जमीन खरेदी करताना खरेदीदाराने जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रकल्प अहवालही जोडलेले दाखविण्यात आले. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमीन खरेदी करताना काहींनी मुद्रांक शुल्कामध्ये सवलतही मिळवली. मात्र आजपर्यंत या जमिनींचा विनीयोग औद्योगिकी करणासाठी न झाल्याने एकप्रकारे शासनाची फसवणूकच झाली आहे.

यांच्यामार्फत करा चौकशी … या सर्व वन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी. उद्योग उभारणी न झालेल्या जमीनी तातडीने ताब्यात घ्याव्यात. मुद्रांक शुल्कामध्ये मिळविलेल्या सवलतींची तपासणी करुन पुर्ण मुद्रांक शुल्क भरुन घेण्यात यावे. सदर वन जमीनींचे निर्वाणीकरण झाले अथवा नाही यासाठी कागदपत्रांची फेरतपासणी करावी आणि वन जमीनींच्या बेकायदेशीर व्यवहारांना मंजूरी देणाऱ्या तत्कालिन अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अश्या मागण्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रांताधिकारी यांच्याकडे केल्या आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,068
भाजप मागणी वन जमीन संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

दुष्काळाबाबतच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत; मात्र शेतकऱ्यांना ठोस मदतीपासून वंचित ठेवू नका — किसान सभा

26/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.