Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल… अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना २० वर्षांचा तुरुंगवास
न्यायालय

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल… अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना २० वर्षांचा तुरुंगवास

दंडाची रक्कम न भरल्यास भोगावा लागेल अतिरिक्त कारावास
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३१ मे

अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना जिल्हा व सत्र न्यायाधीश मलकापट्टी रेड्डी यांनी २० वर्षे सश्रम कारावास व ४५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. वसंत तुकाराम गांगोडे (वय ३५), हरिदास ऊर्फ सोनू पांडुरंग राऊत (२०) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ मध्ये ही घटना घडली होती. आरोपी गांगोडे व राऊत यांनी एका अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात एकटे गाठले होते. नैसर्गिक विधीसाठी ती शौचालयात गेली असता गांगोडे याने आतमध्ये जाऊन कडी लावून घेत बळजबरीने अत्याचार केले होते. तसेच राऊत याने पीडितेसोबत तिच्या राहत्या जाऊन अत्याचार केला होता.

याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी बलात्कार व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी करीत सबळ पुरावे गोळा करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

जिल्हा न्यायाधीश मलकापट्टी रेड्डी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

न्यायालयाने युक्तिवाद व तपासी अंमलदाराने सादर केलेले पुरावे, फिर्यादी, पंच, साक्षीदार यांनी दिलेल्या साक्षीला अनुसरून दोन्ही आरोपींना दोषी धरले. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी तीन व सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागू शकतो, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 891
जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.