Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंचे पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरू; महायुती सरकारवर साधला निशाणा
गुन्हेगारी

सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंचे पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरू; महायुती सरकारवर साधला निशाणा

उपोषणामुळे महायुती सरकार समोरील पेच वाढणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दिनांक ८ जून २०२४

मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरू केले असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवार (दि. ८) पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्याआधी आंतरवालीतील काही ग्रामस्थांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जरांगेंच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही जरांगे उपोषणावर ठाम असून आजपासून त्यांनी आंतरवालीत उपोषण सुरु केले आहे.

मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवदेन देऊ का?… “माझ्या उपोषणाला परवानगी मिळू नये हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचे आंदोलन दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. त्यांच्या निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवदेन देऊ का? असा सवाल उपस्थित केला.

सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी … ”लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ४ जून रोजीच्या उपोषणाच्या तारखेत बदल करत ८ जून रोजी केली होती. त्यानुसार आजपासून उपोषण सुरू केले असून राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे.

विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार … जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशारा दिला.

आरक्षण दिले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना लोक डोक्यावर घेऊन नाचतील … आमचे ध्येय मराठा आरक्षण आहे. सरकारने ठरलेले मराठा आरक्षण आम्हाला द्यावे. लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेऊन नाचतील. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमची मागणी असलेल्या सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी एवढीच आमची मागणी आहे. या मागणीसाठीच मी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहे. तर सरकारला हा कायदा करण्यासाठी काही पुराव्याची गरज लागत असेल तर तब्बल ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत”, असेही मनोज जरांगे म्हणाले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 514
उपोषण मनोज जरांगे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

By Annant Ppangarkar16/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजापूर ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत…

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.