शनिवार, दिनांक ८ जून २०२४
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ठेवलेल्या प्रस्तावावर गौरव गोगोई, के. सुधाकरन, तारीक अन्वर यांनी समर्थन दिल्यानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनिया गांधी फेब्रुवारीमध्ये राज्यसभा म्हणून राजस्थानमधून निवडून आल्या आहेत.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आजच काँग्रेसच्या कार्य समिती बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घ्यावी असा काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह आहे. आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधींना पार पाडण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला. पण, राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला.


