Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर, १२ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर ३० पेक्षा अधिक केंद्रांना नोटीस
शेती व सहकार

नगर जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर, १२ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर ३० पेक्षा अधिक केंद्रांना नोटीस

संगमनेर, अकोले, राहुरी व नेवासे तालुक्यात कारवाई
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 17, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार दिनांक १७ जून २०२४

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यात अचानक करण्यात आलेल्या तपासणींमध्ये बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. ३० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या तर तीन ठिकाणी थेट गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग बियाणे खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. बाजारपेठेत कपाशी सोयाबीन कडधान्य पिकाच्या बियाण्यांना मोठी मागणी असून बियाण्यांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने अचानक भेटीद्वारे कृषी विभागाने कृषी केंद्रांची तपासणी करत कारवाई सत्र सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बाजारात बियाणे खतांची टंचाई भासणार नाही काळाबाजार होणार नाही लिंकिंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आदेश कृषी विभागाला दिल्यानंतर जिल्हा पातळीवरून स्वतंत्र आणि तालुका पातळीवर चौदा अशा एकूण पंधरा पथकांद्वारे कृषी केंद्राची तपासणी केली जात आहे. विक्रीसाठी येणारे बियाणे, विक्री झालेले बियाणे, शिल्लक साठ्याची बॅच नंबरसह तपासणी केली जात आहे. माहिती अद्यावत न ठेवणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ३१३ बियाण्यांचे नमुने, १३९ खतांचे नमुने आणि ६२ खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. नेवासा येथे तिघात विरोधात कपाशी बियाणांचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनियमितता असलेल्या सहा बियाणे विक्री केंद्रांचे परवाने, खतांचे तीन आणि कीटकनाशकांचे तीन अशा बारा कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. ३० पेक्षा अधिक जणांना नोटीस बजावण्यात आले असून त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे गुण नियंत्रक ए. एस. ढगे यांनी सांगितले.

येथे केली कारवाई…

दरम्यान काळाबाजार करणे साडेदहाराने बियाण्यांची विक्री करणे आणि रेकॉर्ड ठेवण्यात अनियमित्ता ठेवणाऱ्या जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, राहुरी, नेवासा येथे प्राधान्याने कारवाया करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये तपासणी सुरू असून तेथील अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,151
कारवाई कृषी विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

घारगाव पोलिसांची कारवाई: येठेवाडी शिवारात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त, १० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.