Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर तिच्या मृत्यूचे कारण आले समोर, घाटात दगडावर डोके आपटून केला खून आणि शहरालगतच्या बाह्यमार्गावर अंगावरून चारचाकी घालत केला अपघाताचा बनाव; आरोपी अटकेत
गुन्हेगारी

अखेर तिच्या मृत्यूचे कारण आले समोर, घाटात दगडावर डोके आपटून केला खून आणि शहरालगतच्या बाह्यमार्गावर अंगावरून चारचाकी घालत केला अपघाताचा बनाव; आरोपी अटकेत

विवाहबाह्य संबंधात प्रियकरानेच काढला तिचा काटा, बाजीराव अटकेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १८ जून २०२४

शुक्रवारी (१४ जून) रात्री संगमनेर शहरालगत असलेल्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात एका महिलेचा संशयस्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यापाठोपाठ खून प्रकरण समोर आणण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या विवाहितेचा काटा तिच्या प्रियकरानेच काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बाळासाहेब बिरू हळणर (रा. आंभोरे ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

रंजना शिवाजी खेमनर (वय ३५ वर्ष, रा. अंभोरे तालुका संगमनेर) ही विवाहिता आपल्या सासूसोबत शुक्रवारी संगमनेरमधील रुग्णालयात सासूच्या डोळ्याच्या उपचारासाठी आली होती. सायंकाळी डबा आणण्याच्या निमित्ताने ती बाहेर गेली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती रुग्णालयात परतली नव्हती. दरम्यान संगमनेर पोलिसांना बाह्यवळण मार्गावर कासारवाडी गावच्या शिवारात एका महिलेच्या संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह रंजना खेमनर ही जात असल्याचे समोर आले. ती तिकडे का व कशासाठी गेली, तिचा अपघात झाला की घातपात हे कोडे सर्वांनाच पडले होते.

दरम्यान शहर पोलिसांनी या संदर्भात सुरुवातीला अकस्मात व नंतर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गावातीलच बाळासाहेब बिरू हळणर याला ताब्यात घेतल्यावर या खून प्रकरणाचा उलगडा झाला.

मृत विवाहिता रंजना शिवाजी खेमनर आणि बाळासाहेब बिरू हळणर यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मी यातून बाळासाहेब तिच्या मागण्या पूर्ण करत असे. आर्थिक आणि सोन्याच्या रुपात होणाऱ्या सातत्याच्या मागणीला कंटाळून त्यांच्यात काही दिवसापासून वाद देखील सुरू होते. यातूनच विकोपाला गेलेल्या वादामुळे त्याने तिचा काटा काढण्याचे ठरविले होते.

शुक्रवारी सासू सोबत दवाखान्यात आल्याची संधी साधत त्याने आपल्या दुचाकीवरून तिला चंदनापुरी घाटात नेले होते. घाटात निर्जन स्थळी त्यांच्यात गप्पा सुरू असताना त्याने एका बेसावध क्षणी तिचे डोके दगडावर आपटले. यातच तिचा मृत्यू झाला. मृतदेह तेथेच ठेवले तर आपण पकडले जाऊ, या भीतीने त्याने प्लॅनिंग करत नवा बनाव तयार केला.

त्याने काही वेळ मृतदेह तेथेच लपवून ठेवत घरी आला. दुचाकी घरी ठेवत आपले चार चाकी वाहन घटनास्थळी नेले. त्यात तिचा मृतदेह टाकून महामार्गावरील टोल नाका टाळून आडमार्गाने जवळ बाळेश्वर, निमगाव, खांडगाव मार्गे संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात आला.

बाह्य वळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान वाहतूक शांत असल्याचा फायदा घेत त्याने तिचा मृतदेह गाडीतून खाली टाकला आणि मृतदेहाच्या अंगावरून आपले चार चाकी घेऊन गेला. त्यामुळे बघणाऱ्यांना हा अपघात वाटेल असे चित्र त्याने घटनास्थळी निर्माण केले होते. पोलिसांना शनिवारी मध्यरात्री मृतदेह आढळून आला आणि तपासाअंती या खून प्रकरणाला वाचा फुटली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,621
गुन्हेगारी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.