Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपीसाठी पायघड्या, ‘लाडोबाचे’ लाड पुरविण्यासाठी आता वैद्यकीय यंत्रणा सज्ज?
गुन्हेगारी

दूधगंगेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपीसाठी पायघड्या, ‘लाडोबाचे’ लाड पुरविण्यासाठी आता वैद्यकीय यंत्रणा सज्ज?

ठेवीदार सैरभैर...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/06/2024Updated:23/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आरोपी भाऊसाहेब कुटे न्यायालयीन कोठडीतून ग्रामीण रुग्णालय आणि आता नगरच्या जिल्हा रुग्णालयात… तेथून व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी (?) पुण्याला हलविण्याच्या हालचाली 

वैद्यकीय अहवालाबाबत तुरुंग अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षकांचेही मौन, सगळे प्रकरणच बनतय संशयास्पद 

आंदोलनादरम्यान पुढाकार घेणाऱ्या ठेवीदारांच्या नेत्यांचेही मौन 

रविवार, २३ जून | अनंत पांगारकर 

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला अचानकपणे संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात व तेथून अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान आरोपीला नेमकं काय झालंय याबाबत सर्वच यंत्रणांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे आरोपीला ट्रीटमेंटच्या नावाखाली कोठडीतून बाहेर काढून व्हीआयपी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहे.

संगमनेरमधील दूधगंगा नागरी पतसंस्थेचे सुमारे ८१ कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी भाऊसाहेब कुटे पोलिसात हजर झाल्यापासून हाय प्रोफाईल बनण्याच्या मार्गावर आहे. अनेक संशयास्पद गोष्टींमुळे तपास यंत्रणेसह सर्वच संबंधित यंत्रणांनी आरोपीसाठी पायघड्या घातल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आरोपीला नगर येथे का दाखल करण्यात आले ? याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संगमनेरचे दुय्यम कारागृह अधीक्षकांनी मौन बाळगले असून जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांनीदेखील संपर्क करूनही प्रतिसाद दिला नसल्याने आरोपीच्या आजाराबाबत, त्याला रुग्णालयात दाखल केल्या बाबत संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ठेवीदार व आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पिडीतांमध्ये उलट सुलट चर्चा, आरोप सुरू आहेत.

संगमनेरातील सहकार क्षेत्रात झालेला सर्वात मोठा अपहार आणि बड्या राजकीय पुढार्‍यांचा त्यात असलेला सहभाग म्हणून बहुचर्चित बनलेल्या दूधगंगा नागरी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला अटक करण्यात तपास यंत्रणेला सपशेल अपयश आले होते. मुख्य आरोपी असलेल्या कुटे याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर कुटे स्वतः पोलिसांकडे हजर झाला. दरम्यानच्या नऊ महिन्याच्या काळात त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी, अन्य आरोपींनी तपास यंत्रणेला गुंगारा दिला आहे. अद्यापही यातील प्रमुख कर्जदार आरोपींना बेड्या घालण्याचे धाडस आर्थिक गुन्हे शाखा दाखवू शकली नाही. त्यामुळे ठेवीदारांमध्ये विविध चर्चा सुरू आहे.

मुख्य आरोपी कुटे याला न्यायालयीन कोठडीच्या कालावधीत संगमनेरच्या दुय्यम कारागृहात ठेवण्यात आले. मात्र चार दिवसांपूर्वी सदर आरोपीला संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आजारपणाचे कारण दाखवून ॲडमिट करण्यात आले आणि त्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार आरोपीला थेट नगरच्या सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १८ तारखेला अहवाल (मेमो) दिल्यानंतर कारागृह अधीक्षक तथा तहसीलदारांनी देखील लगेच याच दिवशी आदेश काढून झटपट कार्यवाही केली आहे.

केवळ पोलिसांच्या पत्रावरून उपचारासाठी हलविल्याचा हवाला देण्यात आला असला तरी आरोपीला नेमका कोणता आजार झाला याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. तसेच नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) संजय घोगरे यांच्याशी देखील संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरुवातीला तपास यंत्रणा, पाठोपाठ तुरुंग यंत्रणा आणि आता वैद्यकीय यंत्रणा याबाबत मौन बाळगून असल्याने संशय निर्माण झाला आहे. एकंदरीत सर्व बाबी पाहता या प्रकरणी एवढे मौन बाळगण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी, त्याला नेमका कोणता आजार झाला आहे आणि रुग्णालयात किती दिवस ठेवावे लागणार आहे याबाबत देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चुप्पी साधण्यात आलेली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,831
ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.