Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाच प्रकरणात मेडिकल ऑफिसर (MO) पोलिसांच्या ताब्यात
गुन्हेगारी

लाच प्रकरणात मेडिकल ऑफिसर (MO) पोलिसांच्या ताब्यात

लाखात पगार तरीदेखील पैशाचा मोह सुटेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २६ जून 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाचे बिल स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी दहा टक्के प्रमाणे लाच मागणाऱ्या मेडिकल ऑफिसर विरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

डॉ. अंबर श्रीराम मडावी (वय ४४ वर्ष) असे लाचखोर मेडिकल ऑफिसरचे नाव असून त्याची नेमणूक वैद्यकीय अधिकारी म्हणून बाराभाटीच्या आयुर्वेदिक दवाखान्यात आहे. याशिवाय त्याच्याकडे महागाव तालुका अर्जुनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार आहे.

तक्रारदार हे प्राथमीक आरोग्य केंद्र महागाव येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांच्या वेतन निश्चिती, नक्षलभत्ता, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीच्या फरकाचे ६ लाख ७ हजार ३२० रुपये रकमेचे बील स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या कार्यालयात पाठविण्याकरीता बिलाच्या रकमेवर १०℅ प्रमाणे ६० हजार रुपये लाच मागणी करीत असल्याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती.

दि. ११ जुन व १२ जुन रोजी आरोपीने लाच म्हणून ६० हजार रुपयाची मागणी केली. ६ लाख ७ हजार ३२० रूपये रकमेवर १०% प्रमाणे टक्केवारी मागितली आहे. तडजोडीअंती लाच ४८ हजार रुपये ८% प्रमाणे देणे ठरले मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच लुचपत विभागाने सोमवारी (२४ जुन) अर्जुनी मोरगाव (गोंदिया) येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात या लाच प्रकरणी कारवाई केली.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अर्जुनी मोरगाव येथील पोलीस ठाण्यात डॉक्टर मडावी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस हवालदार संजय कुमार बोहरे, महेश काहालकर, पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, महिला पोलीस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक पोलीस शिपाई दीपक बाटबर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,356
लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.