Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोर आयुक्त जावळे आणि त्याचा सहाय्यक देशपांडे फरार, देशपांडेच्या घरी ‘एलसीबी’ला सापडलं घबाड
गुन्हेगारी

लाचखोर आयुक्त जावळे आणि त्याचा सहाय्यक देशपांडे फरार, देशपांडेच्या घरी ‘एलसीबी’ला सापडलं घबाड

अहमदनगरमध्ये बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दोघा लाचखोरांच्या शोधासाठी पथके रवाना

लाचखोर जावळेच्या आयुक्तपदी नेमणुकीची शिफारस केली होती या आमदाराने तर या तत्कालीन मंत्र्याने केली होती नियुक्ती

शुक्रवार, २८ जून 

तब्बल आठ लाखाची लाच मागणाऱ्या अहमदनगर आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघेही लाचखोर अधिकारी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तर देशपांडे यांच्या घरी घेतलेल्या घरझडतीत लाच लुचपतच्या पथकाला घबाड हाती लागल आहे.

डॉ. जावळे आणि देशपांडे यांच्या मागावर लाच लुचपतची तीन पथके विविध ठिकाणी कार्यरत झाली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. दुसरीकडे जावळे यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या घराची घरझडती नगर लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी घेतली असता त्यांना रोकड रकमेसह अन्य काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

घरझडतीमध्ये ९३ हजार रुपयांची रोख रक्कम, साडे आठ तोळयांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळुन आली आहेत. या मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे मिळत आहे. तसेच बीड जिल्हयात  देखील त्याने शेतजमीन खरेदी केल्याचे दिसुन येत आहे.

डॉ. जावळेंसाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने केली होती शिफारस…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्राजक्त तनपुरे नगरविकास राज्यमंत्री असताना अकोले मनपामधे उपायुक्त असलेले पंकज जावळे यांना अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्तीची शिफारस केली होती. त्यानुसार जुलै २०२२ ला डॉ. जावळे मनपात आले. नगरसेवकांचा कालावधी २७ डिसेंबर २०२३ ला संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २६ डिसेंबरला आ. जगताप यांनी नगरविकास प्रधान सचिवांना डॉ. जावळे यांना प्रशासक पदाचा कार्यभार सुपूर्द करण्याची मागणी केली होती. आ. जगताप यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची शिफारस करायला नको होती, असे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख म्हणाले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,048
अहमदनगर लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.