Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली प्रशासनाची झाडाझडती, श्रीगोंदा प्रकरणी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आंदोलन मागे
आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली प्रशासनाची झाडाझडती, श्रीगोंदा प्रकरणी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आंदोलन मागे

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थी नंतर निघाला मार्ग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २९ जून

गौण खनिज पथकावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच अधिवेशन चालू असल्याने तातडीने काम बंद आंदोलन मागे घ्यावे अशा सूचना केल्यानंतर शनिवारपासून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती समजते. तर श्रीगोंदे प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री बैठक घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. श्रीगोंदे तालुक्यातील चवरसांगवी येथे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर झालेल्या आल्यानंतर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. जिल्हा तलाठी संघाच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. यामुळे महसूलशी संबंधित कामांकरिता आलेल्या नागरिकांचे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी याचे गंभीर दखल घेत शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या दालनात जिल्हा तलाठी संघ व जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांच्या समवेत कामबंद आंदोलना संदर्भात बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, श्रीगोंदाचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

गौण खनिज पथकावर झालेल्या हल्ल्या संदर्भात पोलीस निरीक्षकांनी वेळेत मदत का पुरविली नाही याबाबत विचारणा करत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. यापुढील कारवाईनदरम्यान त्यांनी पोलीस सुरक्षा पुरविण्याबाबत सूचना दिल्या. तसेच संघटनेने पथकासोबत किमान नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी असावा, शासकीय वाहन असावे, कारवाईसाठी कायमस्वरूपी बंदोबस्त असावा अशा मागण्या केल्या. पोलीस बंदोबस्ताशिवाय पथकाने कारवाईसाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे.

तसेच अवैध गौण खनिज उत्खननाबाबत केवळ तलाठी व मंडल अधिकारी यांना जबाबदार न धरता त्या-त्या गावातील सरपंच, स्थानिक नागरिक, पोलीस पाटील, ग्रामसेवक व पोलीस विभागाचे बीट अंमलदार यांच्यावर सुद्धा जबाबदारी निश्चित करावी, केवळ ग्रामदक्षता कमिटी स्थापन करून चालणार नाही तर त्यांनी सुद्धा अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान श्रीगोंदातील हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी शिवाय तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे अन्य आरोपींची नावे माहीत असल्यास पथकातील सदस्यांनी कळवावी असे देखील बैठकीत सांगण्यात आले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 716
आंदोलन जिल्हाधिकारी महसूल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.