Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील या आरोपीच्या स्थानबद्धतेचे दिले आदेश
गुन्हेगारी

जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील या आरोपीच्या स्थानबद्धतेचे दिले आदेश

१ वर्षासाठी कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २९ जून

वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या संगमनेरमधील रवींद्र राधाकिसन डेंगळे याला अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून डेंगळे याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये हजर करण्यात आले आहे.

रवींद्र राधाकिसन डेंगळे (वय ३५ वर्ष, रा. निमगावजाळी ता. संगमनेर जि. अहमदनगर हल्ली रा. सायखिंडीफाटा, संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) याच्या विरोधात संगमनेर शहर, संगमनेर तालुका, आश्वी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधे द्रव्य विषयक गुन्हेगार, व्हिडिओचाचे, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूच्या काळा बाजारात सामील असलेल्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबतच्या अधिनियम अन्वय धोकादायक व्यक्ती या मथळ्याखाली जिल्हाधिकाऱ्यांनी डेंगळे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

डेंगळे अतिशय आडदांड खुनशी, साहसी, चोरी करण्याचे स्वभावाचा व नंगट स्वभावाचा असून तो नेहमी लोकांमध्ये जोर जबरदस्ती करणे, मारहाण करणे, लोकांच्या खिशातील पैसे काढून घेणे, चोऱ्या करणे, टोळी तयार करणे, दहशत दडपशाहीचा वापर करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत असतो. त्याच्याविरुद्ध आश्वी पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, गृह अतिक्रमण करून दमदाटी करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळेस स्वतःचे अस्तित्व लपवित फिरणे, दरोडा घालण्याची तयारी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे माहिती देण्यात आली.

विविध गुन्ह्यात डेंगळे याला आतापर्यंत अनेकदा अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात न्यायालयातून जामीनावर सुटल्यावर तो पुन्हा पूर्वीप्रमाणे गुन्हे करत असल्याने त्याची मनोवृत्ती व कल हा गुन्हेगारी कृत्याकडे असल्याचे दिसत असल्याने तो समाजात अशांतता निर्माण करू शकतो, तो कायद्याला जुमानत नाही त्याच्या मनात कायद्याविषयी कोणताही आदरभाव, वचक राहिला नसल्याने त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,909
जिल्हाधिकारी पोलीस स्थानबद्ध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कर्जत येथील सोनारगल्लीतील ‘ओम ज्वेलर्स’ हे दुकान फोडून…

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.