Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्यतेल भेसळखोरांविरुद्ध संगमनेरात उपोषण सुरू, तेल कंपन्या प्रशासन सील करेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार: उपोषणार्थी सुनील घुले
आंदोलन

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्यतेल भेसळखोरांविरुद्ध संगमनेरात उपोषण सुरू, तेल कंपन्या प्रशासन सील करेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार: उपोषणार्थी सुनील घुले

भेसळयुक्त तेल, जनतेच्या आरोग्याशी खेळ
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 1, 2024Updated:July 1, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मागणी अयोग्य असेल, लॅबचे रिपोर्ट चुकीचे असतील तर माझ्यासह लॅबवर गुन्हा दाखल करा

श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांना पाठीशी कोण घालतंय?

सोमवार १ जुलै 

संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध अनेकदा तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केले आहे.

संगमनेरमध्ये खाद्य तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने हे तेल खाण्यास अयोग्य आहे. आर्थिक फायद्यासाठी स्वतःची संपत्ती वाढविण्यासाठी लोकांचे जीव गेले तरी चालतील अशा वृत्तीने येथील व्यापारी खाद्य तेलात भेसळ करत असल्याचे तेलाच्या तपासणीनंतर समोर आले आहे. त्यामुळे येथील सजग नागरिक सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले यांनी या विरोधात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र या तक्रारी निवेदनाकडे सपशेल दुर्लक्ष करत त्यांना केराची टोपली संबंधित अधिकाऱ्यांनी दाखविली. त्यामुळे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.

खाद्यतेलात भेसळीचा संशय आल्याने घुले यांनी संगमनेरमधील श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांकडून शेंगदाणा तेल, पामतेल, सूर्यफूल आदी प्रकारच्या तेलाची खरेदी करत त्याची तपासणी पुण्यातील नामांकित लॅब मध्ये करून घेतली असता या तिन्ही उत्पादकांच्या खाद्यतेलात भेसळ असल्याचा धक्कादायक अहवाल लॅबकडून प्राप्त झाला.

त्यामुळे घुले यांनी संबंधितांवर कारवाईसाठी निवेदने दिली, तक्रारी केल्या. तीनही तेल उत्पादक व्यापारी संगमनेरातील बडे प्रस्थ असल्याने त्यांच्यावर कारवाईचे धाडस अन्न औषध प्रशासनासह प्रशासनातील संबंधित अधिकारी दाखवू शकले नाही. नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या यातील कंपन्यांना कोण पाठीशी घालत आहे, त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपोषणार्थी घुले यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक येथील अन्न औषध प्रशासनाचे जॉईंट कमिशनर, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आदी ठिकाणी घुले यांनी पत्रव्यवहार करत या उत्पादकांच्या कंपन्या सील करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा पाठिंबा… माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेना जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, अमोल डुकरे, शाम नाईकवाड़ी, भाऊसाहेब हासे, इम्तियाज शेख, पंकज पडवळ, परवेझ शेख, फैसल सय्यद, इमरान सय्यद, अजीज मोमिन, राजू सातपुते, विजय सातपुते, रंगनाथ फटांगरे, पप्पू कानकाटे, दीपक साळुंखे, शरद कवडे, अशोक बढे, भगवान पोपळघट आदींनी पाठिंबा दर्शविला असून याशिवाय अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ, छात्र भारती, संभाजी ब्रिगेड, ह्यूमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदीसह संगमनेरकर नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

संगमनेरकरांनी पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन…

सदर व्यापारी संगमनेर मधील बडे प्रस्थ असल्याने त्यांच्याकडून राजकीय, पोलीस, प्रशासकीय दबाव टाकून माझ्या नावाची बदनामी देखील होऊ शकते. माझा खेळ विक्रीचा व्यवसाय असून अनेक वर्षापासून मी या व्यवसायातून उदरनिर्वाह करत आहे. मला खटकलेल्या अनेक बाबी संबंधित तेल कंपनीच्या मालकांना देखील सांगितल्या मात्र त्यांनी सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. प्लास्टिकचे डबे तेलासाठी वारंवार वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अनेक वर्षापासून प्लास्टिकचे ड्रम स्वच्छ केलेले नाही. मिलच्या परिसरात दुर्गंधी घाणीचे साम्राज्य आहे. शासकीय नियम अटींचे पालन केले जात नसून अनेक प्रकारच्या त्रुटी समोर असल्याने याबाबत संबंधितांकडे तक्रार केली. अपवादात्मक किरकोळ स्वरूपाची कारवाई करत संबंधित व्यापाऱ्यांबरोबर सेटलमेंट करून घेण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या तेल कंपन्याविरोधात उपोषण असल्याने संगमनेरकरांनी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन घुले यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,506
अमर कतारी उपोषण एस. व्ही. आसावा भंडारी ॲग्रो श्याम ऑइल मिल सुनील घुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्य…

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.