Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे एसएमबीटीमध्ये उद्घाटन, पुढचे तीन महिने घेता येईल लाभ
आरोग्य

राज्यातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे एसएमबीटीमध्ये उद्घाटन, पुढचे तीन महिने घेता येईल लाभ

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2024Updated:02/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

हृदयविकार, कॅन्सर, मूत्रविकार, मेंदू व मनकेविकार शस्रक्रिया पूर्णपणे मोफत

तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे मोफत

शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया अल्पदरात उपलब्ध

सोमवार, ०१ जुलै

राज्यात सर्वात मोठ्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच सर्वसामान्य दर्जेदार उपचार मिळावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य साधना शिबिरास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शुभारंभ करत आज एसएमबीटीमध्ये सुरुवात झाली. शिबिरात बाह्य रुग्ण तपासणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हृदय उपचार, खुबा व गुडघा प्रत्यारोपण, सिझेरियन व नॉर्मल प्रसूती पूर्णतः मोफत करण्यात आली. याशिवाय तीन दिवस औषधोपचारासह बाह्य रुग्ण तपासणी देखील मोफत केली जाणार असून राज्यातील सर्वात मोठ्या या आरोग्य शिबिरात सलग तीन महिने रुग्णांवर मोफत व अल्प दरात उपचार केले जातील.

इगतपुरी तालुक्यातील सिन्नर-घोटी मार्गावर असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य उपचार मोफत केले जातात. राज्यातील सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविणारे हॉस्पिटल म्हणून एसएमबीटीचा लौकिक आहे. गेल्या वर्षी आरोग्य साधना शिबिरात तीन लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.

एसएमबीटीमध्ये यंदा कर्करोग, मेंदू संबंधित आजार, मनकेविकार, पोटविकार, दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, मूत्ररोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, जनरल सर्जरी यासोबतच हृदयविकारांवर मोफत शस्रक्रिया केल्या जात आहेत. विशेष म्हणजे सिझेरियन प्रसूती, नॉर्मल प्रसूती यासह व्हेरीकोस व्हेन्स शस्रक्रिया, मोतीबिंदू शस्रक्रिया, तिरळेपणा शस्रक्रिया, संततीची शस्रक्रिया तसेच गरोदर मातांशी सलंग्नीत सोनोग्राफी व रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या शिबीरात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण देखील होणार आहे.

९१० हजार बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये शेकडो अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ सेवा बजावत आहेत. शिवाय प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ओपीडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले १७ मॉड्यूलर ऑपरेशन थियेटर्स, 24 तास उपलब्ध असणारा अतिदक्षता अपघात विभाग आणि स्वच्छ व विस्तीर्ण हॉस्पिटलचा परिसर यामुळे महाराष्ट्रातील महत्वाचे आरोग्य उपचार केंद्र म्हणून एसएमबीटीचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे.

एसएमबीटी हॉस्पिटल संलग्नीत हार्ट इन्स्टिट्यूटमध्येही शिबीर कालावधीत सर्वच हृदय उपचार शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत होणार आहेत. यामध्ये हृदयविकार ग्रस्त रुग्णांची अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपास, वॉव्ह बदलणे व दुरुस्त करणे, लहान मुलांची ओपन हार्ट सर्जरी, बलून, पेसमेकर इम्प्लांट, जन्मजात हृदयविकार, ई-पी स्टडी, आदी महत्वाच्या शस्त्रक्रिया या विभागात पूर्णत: मोफत होत आहेत. यासाठी निष्णात कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओसर्जनची पूर्णवेळ टीम येथे कार्यरत आहेत. हा हृदयरोग विभाग आजमितीला उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अत्याधुनिक विभाग मानला जातो. अत्याधुनिक कॅथलॅब कार्यन्वित असून येथील प्रत्येक सामग्री ही अत्याधुनिक प्रकारची आहे. त्यामुळे हृदयरुग्णांवरचे उपचार दर्जेदार आणि सुरक्षित होतात.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यामुळे व त्यावरील एसएमबीटी इंटरचेंज अगदी जवळ असल्यामुळे वैजापूर, बुलढाणा, औरंगाबाद, अमरावती, बीड, जालना, अकोलासह परिसरातील रुग्णांना एसएमबीटी हॉस्पिटलपर्यंत येणे सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

एसएमबीटी केअर प्लस…

राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी एसएमबीटी हॉस्पिटलकडून विशेष सोय करण्यात आली आहे. अतिशय नाममात्र दरात स्पेशल रूम याठिकाणी रुग्णांसाठी साकारण्यात आलेले आहेत. एक रुग्ण, दोन रुग्णांसाठी किंवा तीन रुग्णांसाठी याठिकाणी विशेष रूम उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आरोग्यसाधनेच्या माध्यमातून रुग्णसेवा

आजपासून सुरु करण्यात आलेले आरोग्यसाधना शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. गेल्या आठ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले जाते आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार तेही मोफत तसेच परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हावेत हा हेतू यामाध्यमातून साकार होताना आनंद होत आहे. पहिल्याच दिवशी आरोग्यसाधना मदत केंद्रात रुग्णांची गर्दी पाहता हे शिबीर किती महत्वाचे होते याचा अंदाज लावता येईल. – डॉ. सुधीर तांबे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 6,172
एस एम बी टी हॉस्पिटल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.