Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एका ठाकरेंचे इंजिन सोडणारे वसंत मोरे आता दुसऱ्या ठाकरेंची मशाल हाती घेणार!
राजकारण

एका ठाकरेंचे इंजिन सोडणारे वसंत मोरे आता दुसऱ्या ठाकरेंची मशाल हाती घेणार!

एक्सवर जय महाराष्ट्र म्हणत दिले संकेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240704-WA0022.mp4

गुरुवार ४ जुलै 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता मोरे यांनी आंबेडकरांचीही साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ठाकरे गटाकडून मोरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

https://x.com/vasantmore88/status/1808791238285668776?s=19

पुण्याच्या मोरे यांनी इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले आता तेथून खाली उतरत मशाल हाती घेण्याचा नवा राजकीय निर्णय मोरे यांनी घेतला आहे.

राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली. काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शिवाय त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारीही मिळाली. पण मोरे त्यात त्यांचा पराभव झाला. शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ते वंचितची साथ सोडणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत, विनायक राऊतही उपस्थित होते. त्यांच्या पक्षा प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे.

मोरे यांचा पक्ष प्रवेश ९ जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोरे यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने मोरे यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. आता मात्र मोरे यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मनसे, वंचितनंतर मोरे आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत वसंत मोरे? 

वसंत मोरे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते पुणे मनसेचे शहर अध्यक्षही होते. पालिका अधिकाऱ्याची गाडी त्यांनी हातोड्याने फोडली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. एक आक्रमक नेते म्हणून त्यांची पुण्याला ओळख आहे. पुणे लोकसभेची जागा मनसेने लढवावी, अशी त्यांची मागणी होती. तशी इच्छाही त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली होती. राज यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. शिवाय त्यांचे आणि अमित ठाकरे यांचेही बिनसले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. 

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 670
पक्षप्रवेश पुणे वसंत मोरे शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.