Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरलेल्या दंडकारण्य अभियानास उद्यापासून सुरुवात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरलेल्या दंडकारण्य अभियानास उद्यापासून सुरुवात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

अठरा वर्षापासून परंपरा सुरू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 5, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन

शुक्रवार ५ जुलै

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ शनिवारी ६ जुलैपासून करण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आयोजित १८ व्या दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, प्रा. बाबा खरात, दत्तात्रय चासकर, बाबुराव गवांदे, दशरथ वर्पे, प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डॉ. दीनानाथ पाटील, मुख्याध्यापक संजय लहारे, श्रीराम कुऱ्हे, नगरपालिकेचे प्रल्हाद देवरे, रोहिणी गुंजाळ, प्रकाश कोटकर आदींसह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली असून यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उघडी बोडकी डोंगर हिरवीगार दिसू लागली आहेत.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी प्रत्येक गावातील मोकळ्या जागेत रस्त्यांच्या दुतर्फा क-हे घाट, चंदनापुरी घाट व कोंची घाट या ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावोगावी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवरती देण्यात येणार आहे.

कोरोना संकट आपण सर्वांनी अनुभवले आहे. ऑक्सिजनचे महत्त्व अनन्यसाधारण असून ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वांनी यावर्षीच्या दंडकारण्य अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, यामध्ये विद्यार्थी व महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून महिलांनी आपल्या घराच्या परसबागेत वृक्षारोपण करावे, आवळा, कढीपत्ता, लिंब, जांभूळ, आंबा यासारखी विविध वृक्षांची रोपण करून त्याचे संगोपन करावे.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक व्यक्तीने दोन झाडांचे रोपण करून त्याचे संगोपन करावे. विद्यार्थ्यांनाही एक मूल एक झाड याप्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी शासनाच्या वृक्षारोपण व संवर्धनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी अनिल थोरात, सतीश गुंजाळ, नामदेव गायकवाड, दंडकारण्य अभियानाचे बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे, वनविभागाचे सचिन लोंढे, एच. डी. केदार, एम. एस. खेमनर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 575
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.