शनिवार, ०६ जुलै
संजय गांधी निराधार योजनेचे जून महिना अखेर पर्यंतचे २ कोटी ४८ लाख ०४ हजार ८०० रुपयांचे अनुदान शनिवारी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.

असे आहे अनुदानाचे वाटप –
- संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्याना ७७ लाख ७६ हजार ६०० रुपये
- जून महिन्याचे अनुसूचित जातीसाठीचे ५६२ लाभार्थ्याना ८ लाख ३५ हजार २०० रुपये
- एप्रिल, मे आणि जून महिन्याचे अनुसूचित जमातीसाठीचे २२६ लाभार्थ्यांना १० लाख ०८ हजार रुपये
- जूनचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनत सर्वसाधारण ५३११ लाभार्थ्यांना ७९ लाख ६६ हजार ५०० रुपये
- जूनचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत अनुसूचित जातीच्या ६९५ लाभार्थ्यांना १० लाख ४२ हजार ५०० रुपये
- एप्रिल आणि मे महिन्याचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुसूचित जमातीच्या ३२४ लाभार्थ्यांना ९ लाख ७२ हजार रुपये
- जूनचे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ४०२८ लाभार्थ्यांना ५२ लाख ०४ हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक लवकर घेणार असून कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्यांनी जमा करावी. तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम, अटी पूर्ण करू न शकल्या नाही त्यांची प्रकरणे नामंजूर झालेली आहेत. त्यांनी मुख्यमंत्री- लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
ज्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांनी लाडकी बहिण योजनेसाठी फॉर्म भरू नये. संगमनेर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावात मेळावे सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही एजंटाकडे कागदपत्रे, पैसे देऊ नये. महायुती सरकारतर्फे योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा संकल्प असून त्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.
योजनांची प्रकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्या अथवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा संगमनेर विधानसभा भाजपाचे निवडणूक प्रमुख खताळ यांनी केले आहे.



