Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कारवाईसाठी पोलिसांना शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडेना की गंभीर घटना घडण्याची प्रतीक्षा!
गुन्हेगारी

कारवाईसाठी पोलिसांना शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडेना की गंभीर घटना घडण्याची प्रतीक्षा!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार १२ जुलै

सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा लागलेला कलंक पुसण्यात स्थानिक पोलिसांपासून जिल्हा पोलीस दलापर्यंतची पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरली आहे. शहरातील शांततामय वातावरणाला गालबोट लागू शकेल अशी गंभीर घटना घडण्याची पोलीस वाट बघत आहे की त्यांना अवैध धंदे सुरू असलेल्या शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडत नाही, असा संशय निर्माण झाला आहे.

चार दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने संगमनेर शहराच्या मध्यवस्तीतील महापुरुषांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकत हॉटस्पॉट बनलेल्या या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची चिन्हे असल्याचा संशय वर्तविला होता. त्यानंतर पोलिसांकडून या अवैध व्यवसायांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा फोल ठरल्याने पोलिस आणि अवैध व्यावसायिकांमधील मधुर अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या दुजोरा मिळू लागला आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळातील अपवाद वगळता येथील अवैध धंदे कधीही बंद झाल्याचे दिसत नाही. पोलिसांचे या धंद्यांवरील छापासत्र नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीसच नव्हे तर पोलीस उपअधीक्षकांचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षकांचे पथक, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पथक आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या अवैध व्यवसायांवर कारवाया करताना दिसतात. माध्यमातून या कारवायांच्या बातम्या होत असल्या तरी पुढे काय होते हे मात्र समजत नाही.

अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट ठरलेल्या शक्तिमान टॉवर्समध्ये बिंगो गेम, लोटो गेम, ऑनलाइन लॉटरी, गांजा सिगारेट, गुटखा, जुगार याबरोबरच अन्य गोष्टी देखील सर्रासपणे सुरू असतात. हे जवळच असलेल्या पोलीस यंत्रणेला माहिती नाही, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. विशेष म्हणजे या परिसरालगत असलेल्या एका रुग्णालयात दुचाकी आणि पायी जाण्या येण्यासाठी या टॉवर्स मध्ये असलेल्या रस्त्याचा सर्रासपणे वापर केला जातो. रुग्णालयात जाण्या येण्यासाठी या रस्त्याने महिलांचा देखील वावर असल्याने या व्यवसायाच्या कोंडीतून त्यांना देखील जावे लागते. त्यामुळेच येथे एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते. महिलांना येथून येणे-जाणे करणे जिकरीचे बनले आहे. मात्र याचे कोणतेही गांभीर्य अवैध धंदे चालकांना अथवा संबंधितांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणांना असल्याचे दिसत नाही.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240712-WA0027.mp4

अशी आहे स्थिती…

प्रशासकीय इमारतीत असलेले पोलीस उपअधीक्षक यांचे कार्यालय, प्रांताधिकार्‍यांच्या कार्यालयामागे असलेले डॉ. अमोल कर्पे यांचे रुग्णालय, समोरच नासिक पुणे महामार्ग लगत एका बाजूने अवैध धंदे तर दुसऱ्या बाजूने महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, मारुती मंदिर, समोरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (दारूबंदी) भव्य कार्यालय, अवैध धंद्याच्या ठिकाणालगतच मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असून ज्या यंत्रणांनी कारवाई करायची त्या सर्व यंत्रणांची कार्यालय अवघ्या शंभर ते दोनशे मीटर अंतरात आहेत. तरी देखील संबंधितांना या अड्ड्यांचा पत्ता मिळत नसल्याने कारवाई करणाऱ्या यंत्रणेवर संशय निर्माण झाला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,057
अवैध धंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.