Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेरच्या फेरीत जयंत पाटील पराभूत सेनेचे मिलिंद नार्वेकर सहज विजयी… महाविकासचीही मतं फुटली
राजकारण

अखेरच्या फेरीत जयंत पाटील पराभूत सेनेचे मिलिंद नार्वेकर सहज विजयी… महाविकासचीही मतं फुटली

महायुती सुरक्षित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई | प्रवीण पुरो

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानने चुरस वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जय्यत तयारी केली होती. अंतिम निकालात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे.

विजयी उमेदवारात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी, कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस झाली. यात शेवटच्या फेरीत जयंत पाटील पराभूत झाले.

ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक चूरशीची झाली होती. नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंनी धावाधाव केल्याचं बघायला मिळालं. गुरुवारी (११ जुलै) उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचं मार्गदर्शन केलं. यावेळी ठाकरे गटाकडून व्हीप देखील जारी करण्यात आला. तसंच मतदान कशाप्रकारे करायचं याचा डेमो देखील यावेळी आमदारांना दाखवण्यात आला. काँग्रेस पक्षाकडूनही आमदारांना व्हीप बजावण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरुवारी रात्री उशिरा आपल्या आमदारांसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडूनही व्हीप बजावण्यात आला होता. तसंच मतदान कसं करावं, याची सर्व माहिती आमदारांना सांगण्यात आली. ‘द ललित’ हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर ‘प्रेसिडेंट’ हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक पार पडली. या बैठकींमध्येही व्हीप जारी करण्यात आला होता.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीची रंगत फारच वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष अगोदरचे हेवेदावे विसरुन एकमेकांच्या भेटीगाठी घेतानाचं चित्र विधान भवनात दिसून आलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडील ६४ मतांचा विचार केला असता त्यांची पाच मतं फुटली आहेत. मविआसोबत असलेल्या शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोन आमदारांची मतं मोजली असता मविआकडील एकूण ७ मतं फुटल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी माझी १२ मतं मला मिळाली असून काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडीच्या एकूण मतांपैकी ५ मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. महाविकास आघाडीकडे एकूण ६४ मतं होती. त्यापैकी प्रज्ञा सातव यांना २५, मिलिंद नार्वेकर यांना २२ आणि जयंत पाटील यांना १२ मतं मिळाली.

महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता ११ व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मतमोजणी सुरु झाल्यानंतर २७४ मतांची ११ गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली. मिलिंद नार्वेकर यांच्या मतांची गाडी एक-एक करुन पुढे सरकत होती. पहिल्या टप्प्यात त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय मिळवला. भाजपच्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांनीही मोठी आघाडी घेत पहिल्या तासाभरातच विजय मिळवला.

शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे १५ आमदार सभागृहात होते. त्यामुळे, जयंत पाटील यांच्याकडे १६ मते होती. जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी ७ मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती. पण, त्यांना ७ मतांची जुळवाजुळव करणे शक्य झालं नसल्याचं दिसून आलं.

 

विजयी उमेदवार 

भाजप – योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत  

शिवसेना (शिंदेगट) – भावना गवळी, कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे  

काँग्रेस – प्रज्ञा सातव 

शिवसेना (ठाकरेगट) – मिलिंद नार्वेकर

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 624
निवडणूक निकाल विधान परिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.