Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगरची भ्रष्टाचाराने बरबटलेली स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) खासदार निलेश लंकेच्या रडारवर! मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत म्हणाले, सात दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण…
महाराष्ट्र संवाद विशेष

अहमदनगरची भ्रष्टाचाराने बरबटलेली स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) खासदार निलेश लंकेच्या रडारवर! मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत म्हणाले, सात दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण…

जिल्ह्यात पोलीस नावाची यंत्रणा भलत्याच कामात व्यस्त, खासदार लंके यांनी आणले वास्तव समोर!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय, पीएसआय आणि कर्मचारी हप्तेखोर

आर्थिक लोभापाई दोन आस्थापनांचा कारभार एकाच निरीक्षकाकडे

हप्ते गोळा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची बघा नावानिशी यादी

साई मंदिरच्या सुरक्षा विभागात नेमणूक असलेला रवींद्र कर्डिले मास्टरमाईंड

आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र संवाद न्यूजने टाकला होता प्रकाश!

शनिवार १३ जुलै

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा वरदहस्त लाभलेली अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) नगरचे खासदार निलेश लंके यांच्या रडारवर आली असून या गुन्हे शाखेचा कारभाराचा भांडाफोड करत लंके यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याने नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी येत्या सात दिवसात कारवाई झाली नाही तर नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे सबळ पुरावांसह उपोषण करण्याचा इशारा खासदार लंके यांनी दिला आहे. गेल्याच आठवड्यात पोलीस अधीक्षकांच्या मर्जीने सुरू असलेल्या या शाखेच्या कारभारावर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने प्रकाश टाकला होता. (वाचा लिंकमध्ये यापूर्वीची बातमी)

https://maharashtrasanvadnews.com/?p=15901

आता निलेश लंके यांनीच या शाखेच्या गैर कारभाराचा पर्दाफाश करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह शाखेतील कर्मचाऱ्यांची नावानिशी तक्रार केली आहे. राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील प्रमुखांना व पोलीस प्रमुखांना पाठविलेल्या पत्रात लंके यांनी म्हटले आहे की… संतांची पावन भूमी असलेल्या नगर जिल्ह्यात काही वर्षापासून जनतेचे रक्षक असलेले पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व कर्मचारी राजरोसपणे हप्ते घेत आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून राज्यात सर्वात जास्त गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून नगर जिल्हा ओळखला जातो. बीफ मटन, ऑनलाइन क्लब, वाळू, गुटखा, दारू, गांजा, चंदन तस्करी, मटका, बिंगो हे सर्व अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वाद व आश्रयाखाली मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

एलसीबीतील अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेस वेठीस धरीत आहे. जिल्ह्यातील सुवर्णकार व्यवसाय करणाऱ्या सराफ व्यवसायिकांना दमदाटी करून खोट्या गुन्ह्यात अडकवू असे धमकावतात. जिल्ह्यात इतर सर्व कारणामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. नागरिकात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे स्थानिक नागरिकांनी केल्या आहे व करीत आहे. या प्रकरणातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर सात दिवसात कारवाई करण्यासंदर्भात आदेशित करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे. जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर सर्व सबळ पुरावांसह उपोषणास बसणार आहे.

हा आहे मास्टर माईंड… या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड रवींद्र आबासाहेब कर्डिले हा असून कर्डिले याची शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा विभागात नेमणूक असतानादेखील तात्पुरत्या स्वरूपात सायबर सेल अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. कर्डिले याचेवर काही वर्षांपूर्वी एलसीबीमध्ये कार्यरत असताना लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. सदर केस अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात प्रलंबित असून नगर शहरातील एका गुन्ह्यांमध्ये त्याची सीआयडी चौकशीदेखील चालू आहे. इतर गुन्हेही त्याच्यावर आहेत. तसेच कर्डिले हा जिल्ह्यातील इतर पोलिसांवर दबावतंत्र वापरतो अशा कर्मचाऱ्यावर पोलीस खात्याकडून कुठलीच कारवाई होत नाही हे निश्चितच खेदजनक आहे.

दोन शाखांचा कार्यभार निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे… स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) व सायबर सेल ह्या दोन आस्थापना वेगवेगळ्या असून या दोन्ही शाखेचा कार्यभार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे आहे. स्थानिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे प्रलंबित आहे. हे निश्चितच संशयास्पद असून निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

ही आहे हप्ते गोळा करणाऱ्यांची यादी… स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, रवींद्र आबासाहेब कर्डिले, शहाजी आढाव, अमोल भोईटे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल, मनोज गोसावी, बापू फोलाने हप्ते गोळा करण्यासाठी मदत करत असल्याचे लंके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,981
अजित पवार अंबादास दानवे अहमदनगर पोलीस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस निलेश लंके पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक विजय वडेट्टीवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.