गुरुवार १८ जुलै
गडकिल्ल्यांच्या नावाखाली गैरप्रकारातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरात आसरा घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर मंदिरातील पुजाऱ्यांनी अत्याचार करत तिघा समाज विघातक आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संगमनेरमध्ये संविधान प्रेमी भारताचे नागरिक, ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजासह इतर धर्मियांनी प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे.
विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या नावाखाली हिंसाचारासंदर्भात गुन्हेगारांवर तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरामधे महिलेवर केलेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना कठोर शासन केले जावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. समाजकंटकांच्या जमावाने त्याच ठिकाणाहन सात ते आठ किलोमीटर अंतरावरील गजापुर गावातील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते, घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ देखील केलेली आहे.
त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांची देखील विटंबना केली गेली या हिंसाचारात महिला व लहान मुले वयोवृद्ध महिला व पुरुष या हल्ल्यातून बचावलेले नाही त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आलेली आहे. तसेच बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तलवारीने वार करून जखमी करण्यात आलेले आहे. कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध केला आहे.
या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कुठल्याही नेत्या पुढाऱ्याचा, पदाचा मुलाहिजा न ठेवता शक्य तितक्या लवकर त्यांच्यावर कायदेशीर व योग्य चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच ज्यांचे कुणाचे आर्थिक व संसार उपयोगी वस्तूंची नासधूस झाली त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळून देत सदर ठिकाणची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संगमनेर शहर व तालुक्यातील विविध समाज बांधव तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार, एकता सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक डॉ. दानिश खान, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई इनामदार, एकता सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफभाई शेख, सामाजिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मुजाहिद पठाण, तौसीफअली मणियार, हाफिज हमजा, मुस्लिम समाजातर्फे मुफ्ती सालीम साहब सय्यद, बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष अन्सार सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिझभाई ओहोरा, अंजुम शेख, नूर शेख, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्षा बानोबी शेख, तालुकाध्यक्ष सविता भालेराव, शहराध्यक्ष आरती सोनवणे, जिल्हा अध्यक्ष पत्रकार शौकत पठाण, महासचिव जमिर शेख आदी उपस्थित होते.


