Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहाय्यक निबंधकाकडील तक्रार अर्ज मागे घेत नाही म्हणून जीवघेणा हल्ला, घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
गुन्हेगारी

सहाय्यक निबंधकाकडील तक्रार अर्ज मागे घेत नाही म्हणून जीवघेणा हल्ला, घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

संगमनेर तालुक्यातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार २१ जुलै 

संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भाग नेहमीच अवैध सावकारकीच्या घटनांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. बिरेवाडीतील एका सावकार पिडीत व्यक्तीची आर्थिक पिळवणूक झाली, जमीन लाटण्याचा प्रकार केला, मानसिक त्रास देत पैशाचा तगादा लावत शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याने या त्रासाला कंटाळून सबंधित व्यक्तीने संगमनेरच्या उपनिबंधकांकडे तक्रार केली. या रागातून तक्रारदाराबाबत नियोजित कट आखून भ्याड हल्ला करत संपूर्ण कुटुंब संपवायची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (१८ जुलै) सकाळी बिरेवाडी परिसरात घडली.

साकुरजवळील बिरेवाडी गावातील तरुण शेतकरी मुक्ताराम काशिनाथ सागर हे कुटुंबासोबत राहत आहे. याच गावातील सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे हे अवैध सावकारकीचा व्यवसाय करत असून त्यांचेकडून काही दिवसापूर्वी सागर यांनी एक लाख रुपये रक्कम व्याजाने घेतले होते.

या रक्कमेचा आजतागायत बारा लाख रुपये परतावा केला आहे. त्याबाबत पुरावे देखील आहेत. त्यावेळी २० गुंठे जमीन गहाणखत करण्याचे नावाखाली फसवून खरेदी खत करून घेतले असून अजूनही काही वाढीव रक्कमेसाठी शिवीगाळ, मारहाण करत पैशाचा तगादा लावल्याने सागर यांनी उपनिबंधक यांचेकडे तक्रार केली होती. हे प्रकरण उपनिबंधक कार्यालयाकडे न्यायप्रविष्ठ आहे. तक्रार केल्याचा राग मनात ठेवून हल्ला झाल्याचे फिर्यादी सागर यांनी म्हटले आहे.

गुरूवारी सकाळी बिरेवाडी गावातील सोसायटीसमोर तक्रारदार मुक्ताराम सागर व सावकाराचे चुलत भाऊ पंढरीनाथ पांडुरंग ढेंबरे यांचेत याच कारणावरून किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी सदर भांडण मिटवले. यानंतर सागर हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर पंढरीनाथ ढेंबरे त्यांचा पाठलाग करत आले. सागर यांचे मोटरसायकलला गाडी आडवी लावून उभी करतं म्हणाले की, माझा चुलत भाऊ लालू ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश ढेंबरे यांचे विरोधात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज का दिला. तक्रार अर्ज दिल्याचा राग मनात धरून त्यांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर जमिनिवर खाली पाडून मारहाण करत त्याचे हातातील चावीचे कीचनला असलेला चाकू सागर यांचे उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला मारून दुखापत करून जखमी केले. तसेच तक्रार मागे घे. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकील अशी धमकी दिली.

याप्रकरणी मुक्ताराम काशिनाथ सागर यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहेत.

पोलीस डोंगरे यांना अटक कधी करणार…

साकूर परिसरात अवैध सावकारकी फोफावली आहे. याआधी वाकचौरे कुटुंबाला बेघर करणाऱ्या डोंगरे सावकारांवर गुन्हा दाखल आहेत. पण अद्याप या डोंगरे बंधूना अटक करण्यात आली नाही. परंतु नुकताच जिल्हा सत्र न्यायालयाने डोंगरे सावकारांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तेव्हा आता पोलीस डोंगरे यांना अटक करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,328
गुन्हेगारी सावकारकी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.