Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शक्तिमान टॉवर्समधले गंजाडी, जुगारी गायब… बाकी अवैध धंदे सुरूच! पोलीसही भागीदार आहेत का? खासदारांच्या उपोषणाचेही पोलीस यंत्रणेला सोयरसुतक नाही
गुन्हेगारी

शक्तिमान टॉवर्समधले गंजाडी, जुगारी गायब… बाकी अवैध धंदे सुरूच! पोलीसही भागीदार आहेत का? खासदारांच्या उपोषणाचेही पोलीस यंत्रणेला सोयरसुतक नाही

नेमकं चाललंय तरी काय...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार २१ जुलै 

संगमनेरमधील ‘शक्तिमान टॉवर्स’मध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायावर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच येथील वरच्या मजल्यावर सातत्याने आढळणारे गंजाडी, जुगारी आणि दारुडे शनिवार असताना देखील गायब झाल्याचे दिसून आले. मात्र या कॉम्प्लेक्समधील अवैध धंदे शनिवारी देखील सुरूच होते.

सुसंस्कृत संगमनेरला अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लागलेला अवैध धंद्यांचा कलंक अद्यापही कायम आहे. अवैध धंद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणांवर आहे त्या यंत्रणा सध्या तरी सुस्तावल्या असल्याने त्यांच्यावर बातम्यांचा फारसा परिणाम दिसत नाही. एकीकडे पोलीस खात्यातील एलसीबीच्या हप्तेखोरीवरून अहमदनगरचे खासदार उपोषणाच्या तयारीत असले तरी संगमनेरसह जिल्ह्यात अवैध धंदे मात्र अद्यापही जोरात सुरू आहे. खासदारासारखा लोकप्रतिनिधी या विरोधात उपोषणाचा मार्ग स्वीकारत असताना पोलीस यंत्रणेला याचे कोणतेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.

एकेकाळी प्रशिक्षण कालावधीत श्रीरामपूर उपविभागात नावलौकिक मिळविलेल्या राकेश ओला यांच्याकडे सध्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकपद आहे. सुरुवातीपासून कार्यक्षम असल्याचे वाटत असलेल्या या अधीक्षकांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वाधिक अवैध धंदे फोफावले असून सध्या अवैध धंद्यात जिल्हा नंबर वन ठरत आहे. त्यातच अधीक्षकांच्या अधिपत्याखाली असलेली स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) वादात सापडली आहे. या शाखेतील चुकीच्या गोष्टींवर अहमदनगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आवाज उठवल्यानंतर निवडणुकीचे कारण पुढे करत वेळ काढूपणा करण्यात आला. निवडणुकीनंतर देखील शेख यांच्या मागणीकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील या शाखेविरोधात थेट मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार केल्यानंतर देखील फारसा परिणाम होताना दिसत नाही. किमान खासदारांचे उपोषण आहे म्हटल्यावर तरी दाखविण्यासाठी का होईना जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होतील हा आशावाद देखील फोल ठरला आहे.

याच हिमनगाचे एक टोक संगमनेरमध्ये आहे. संगमनेरमध्येदेखील एलसीबीसह अन्य यंत्रणांच्या आशीर्वादाने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एरवी चोरून लपून चालणारे धंदे आता राजरोसपणे सुरू आहे. शहरातील शक्तिमान टॉवरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने प्रशासनाचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस यंत्रणेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शनिवारी या ठिकाणी गंजाडी, दारुडे आणि जुगारी गायब झाल्याचे दिसून आले. मात्र या कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेले अवैध धंदे जोमात सुरू होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 689
अवैध धंदे शक्तिमान टॉवर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.