Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रम – राहुल वाघ
महाराष्ट्र संवाद विशेष

डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रम – राहुल वाघ

संगमनेर मुख्य डाकघर आणि संगमनेर नगरपालिका यांच्यावतीने उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २४ जुलै

डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रमा असून संगमनेर नगरपरिषद पोस्ट विभागाच्या जनकल्याणकारी योजना शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करेल. डाक विभागाची नाळ सामान्य माणसांपर्यंत जोडलेली असल्याने पोस्टाच्या फायदेशीर योजनांचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा, असे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले.

संगमनेर मुख्य डाकघर आणि संगमनेर नगरपालिका यांच्या विद्यमाने संगमनेरमध्ये प्रथमच डाक चौपाल या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात या डाक चौपाल या उपक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकीकर, सहायक अधीक्षक मुख्यालय संतोष जोशी, संगमनेरचे सहाय्यक अधीक्षक रविकुमार झावरे, उपडाकपाल महेश कोबरणे, विपणन अधिकारी अमित देशपांडे, रोखपाल अमोल गवांदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बँक खाते, बाल आधार, आधार-मोबाईल लिंकिंग, अपघाती विमा, महिला सन्मान बचत पत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, टपाल जीवन विमा आदी सेवा पुरवण्यात आल्या.

रविकुमार झावरे म्हणाले, भारतीय डाक विभागाच्या योजना, नागरीक केंद्रित सुविधा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण देशात डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

हेमंत खडकीकर म्हणाले, पोस्टाच्या योजना व नागरिक केंद्रित सेवा यांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी डाक विभाग सर्वतोपरी सज्ज आहे.

यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभधारक राम पराई, श्रीराम झंवर, ऋचा ब्राह्मणकर, प्रशांत पवार, मांगी देवानी आदींसह विविध खातेदारांचा योजनांची पुस्तके आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत अन सत्कार करण्यात आला. वैशाली कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पोस्टाचे, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौरव मंत्री, उमेश ढोले, कल्पेश वाघ, प्रशांत पवार, संजय आंबरे, विजय पथवे यांनी प्रयत्न केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 733
डाक चौपाल राहुल वाघ संगमनेर नगर परिषद संगमनेर पोस्ट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.