Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगर एलसीबीच्या दरमहा हप्त्याचा आकडा ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे… काही कोटीत वसुली, उपोषणार्थी खासदार निलेश लंकेंनी जाहीर केले पोलिसांचे रेट कार्ड
आंदोलन

अहमदनगर एलसीबीच्या दरमहा हप्त्याचा आकडा ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे… काही कोटीत वसुली, उपोषणार्थी खासदार निलेश लंकेंनी जाहीर केले पोलिसांचे रेट कार्ड

नगर पोलिसांच्या भ्रष्टाचाराला पाठबळ कोणाचे?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

हप्तेखोर एलसीबी दरमहा करतेय २७ कोटी ६० लाखाची हप्ते वसुली!

दोन टक्के हप्तेखोरांमुळे जिल्हा पोलीस दलाची नाचक्की, जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का? 

गुरुवार, २५ जुलै 

जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विशेषत: अहमदनगर एलसीबीच्या हप्तेखोरी विरोधात उपोषणास बसलेल्या खासदार निलेश लंके यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नगरचे पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्याचे रेटकार्डच जाहीर केले. नगर एलसीबीकडून तब्बल २७ कोटी ६० लाख रुपयांचे हप्ते दरमहा गोळा केले जात असल्याची धक्कादायक माहिती खासदार लंके यांनी दिली.

खासदार लंके यांनी दिलेली माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाचे डोळे पांढरे होतील अशी धक्कादायक आहे. कोणत्या व्यवसायातून किती रुपयांच्या हप्ते नगरच्या वादग्रस्त एलसीबीकडून गोळा केले जातात याची सविस्तर यादीच लंके यांनी जाहीर केली.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार लंके म्हणाले, जिल्हा पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. या शाखेच्या कृत्यांमुळे समाज भयभीत झाला आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालते? जिल्ह्यात झालेल्या खुनांचा तपास का लागत नाही? स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात? सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात. याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात. आजच याच विभागाच्या चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पोलीस प्रशासनास पुरावे हवेत का, असा सवाल लंके यांनी यावेळी केला.

तीन दिवस झाले तरी पोलीस अधीक्षक भेटीसाठी का येत नाहीत? 

खासदार निलेश लंके यांच्या उपोषणास तीन दिवस झाले आहे तरी पोलीस अधीक्षक त्यांच्या भेटीसाठी का येत नाहीत? भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत आहेत का? सकारात्मक चर्चा होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र वेगळाच प्रस्ताव देतात, याचा अर्थ या भ्रष्टाचारास राज्याच्या गृह खात्याचे पाठबळ आहे असा संदेश राज्यात जाईल. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य पातळीवर हे आंदोलन नेले जाईल. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आम्ही चर्चा करणार नाही, आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करू. – राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

वरिष्ठ पातळीवरून पाठबळ...

काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस दलाला कलंक लावला आहे. त्यांना वरिष्ठ पातळीवरून अधिकारी पाठीशी घालतात हे दुर्दैव आहे. प्राजक्त तनपुरे, आमदार तथा माजी मंत्री.

असे आहे खासदार लंके यांनी जाहीर केलेले पोलिसांचे रेट कार्ड…

चंंदन तस्करी, रेशनींग ४० लाख

हिरा गुटखा ६८ लाख

विमल गुटखा ६० लाख

आरएमडी गुटखा २५ लाख

नगर शहर कॅफे ५० लाख

वाळू ट्रॅक्टर २ कोटी ५० लाख

वाळू गाडी ४ कोटी ८० लाख

जेसीबी १ कोटी ४० लाख

पोकलेन ५० लाख

आयपीएल सट्टा ५० लाख

वेश्या व्यवसाय हॉटेल ३० लाख

इतर अवैध व्यवसाय ५५ लाख

मटका ०७ कोटी ५५ लाख

बिंगो ०१ कोटी ४० लाख

मावा ०१ कोटी ३० लाख

दारू हॉटेल ७५ लाख

डिझेल, पेट्रोल तस्करी १२ लाख ५० हजार

ट्रक रिक्षा १० लाख

जुगार ७५ लाख

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,446
अहमदनगर पोलीस एलसीबी निलेश लंके रेटकार्ड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.