Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाधिकारी लाचेच्या सापळ्यात! गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाधिकारी लाचेच्या सापळ्यात! गुन्हा दाखल

पैशाशिवाय फाईल हलेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २६ जुलै

तीन अंगणवाड्यांच्या बांधकामाचे पैसे ठेकेदाराला काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून २६ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबारच्या अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे व सहाय्यक लेखा अधिकारी रवींद्र लाडे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून या दोघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र लाडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम त्यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही.

यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, सहाय्यक लेखाधिकारी यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल २,४६,८५०/- रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले. परंतु सहाय्यक लेखाधिकारी यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी ८,०००/- व गटविकास अधिकारी यांच्यासाठी १८,०००/- रुपयांची अशी एकूण २६,०००/- रुपये लाचेची मागणी केली.

गुरुवारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे याने आठ हजार रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. तसेच गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून सहाय्यक लेखाधिकारी यांना तक्रारदाराकडून यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपतच्या नंदुरबार युनिटचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस हवालदार विलास पाटील, पोलीस हवालदार विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, पोलीस नाईक हेमंतकुमार महाले, पोलीस नाईक सुभाष पावरा, पोलीस नाईक नरेंद्र पाटील व पोलीस नाईक जितेंद्र महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,772
गटविकास अधिकारी लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.