Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरविली, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार… ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात
विकास

केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरविली, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार… ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २८ जुलै

संगमनेर – केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआयसारख्या संस्था आपल्या गुलाम बनविल्या. दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढीस लागले असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आला असताना त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. प्रचंड जातीभेद आणि घमेंड असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि येथील जनतेने केले आहे.

संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते.

यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, दिलीप साळगट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, राज्यात सध्या अस्तित्वात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. या सरकारमध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका. राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो आहे. जनतेचे हे प्रेम असून आगामी काळात सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे.

दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व त्याचे कालवे आपण पूर्ण केले. तालुक्यातील सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक राज्यात निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

खासदार वाकचौरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. नाशिक पुणे रेल्वे संदर्भात हा मार्ग संगमनेर वरूनच जावा यासाठी आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करणार आहोत.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेत कायम काम केले असल्याने तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. मनाचा मोठेपणा असलेले आमदार थोरात हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव असून सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींची भाषणे झाली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 919
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.