Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नातवामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली आजी, वेळ आली होती पण…; संगमनेरमधील घटना
महाराष्ट्र संवाद विशेष

नातवामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली आजी, वेळ आली होती पण…; संगमनेरमधील घटना

खासगी रुग्णालयात उपचार सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २९ जुलै 

शेतामध्ये गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत तिला शेतात ओढून नेत असताना नातवाच्या हा प्रकार लक्षात आल्याने बिबट्याच्या मागे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून त्याने आजीचा जीव वाचविण्याची घटना समोर आली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगमनेर तालुक्यातील देवगाव गावामध्ये ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भिमाबाई लक्ष्मण लामखडे (वय ७५, रा. देवगाव, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीमाबाई लामखडे आपल्या शेतामध्ये गवताची कापणी करत होत्या. यावेळी जवळच बिबट्या दबा धरून बसला होता. जवळ असलेला बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला नाही. संधी साधा बिबट्याने गवत कापणाऱ्या लामखडे यांच्यावर झेप घेत त्यांना शेतात ओढून नेले.

भिमाबाई यांचा ओरडण्याचा आवाज ऐकल्याने त्यांचा नातू प्रसाद माधव लामखडे याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बिबट्या आजीला ओढत नेत असल्याचे समोरचे दृश्य बघून त्याने देखील आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने बिबट्याच्या मागे धाव घेतली. भिमाबाई आणि प्रसाद यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लामखडे कुटुंबातील लोक आवाजाच्या दिशेने पळाले. त्यामुळे बिबट्याने आजीला सोडून धूम ठोकली.

आजीच्या आवाजामुळे सतर्क झालेल्या प्रसादने देखील आरडा ओरडा केल्याने बिबट्याच्या तावडीतून आजीला वाचविण्यात तो यशस्वी झाला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. भिमाबाई यांच्या गळा, नाक, तोंड, कानाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून शहरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,318
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.