Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेमुळे लोकसभेत काँग्रेसचा फायदा, भास्कर जाधवांच्या शेरेबाजीने आघाडीत वाद
राजकारण

शिवसेनेमुळे लोकसभेत काँग्रेसचा फायदा, भास्कर जाधवांच्या शेरेबाजीने आघाडीत वाद

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०३ ऑगस्ट 

विशेष प्रतिनिधी | मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ”महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत, असे विधान करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो. विशेष करून उद्धव ठाकरे यांनी विशेष भूमिका बजावल्याने काँग्रेस पक्षाचे एवढे खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी आपला एकही खासदार नव्हता हे आनंदाच्या भरात काँग्रेसचे नेते विसरले असतील. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपाचा चर्चेला बसतील त्यावेळी याचे भान काँग्रेसला येईल असा उपरोधीत टोला भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. सध्या काँग्रेसकडून मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. मुंबईत काँग्रेसकडून मुंबईतील सर्वच ३६ मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे निरीक्षक कोणत्या उमेदवाराला पसंती द्यायची आहे, याचा आढावा घेणार आहेत. हा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो वरीष्ठांकडे सोपवला जाणार आहे.

काँग्रेसकडून मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी १५ विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल, धारावी, भायखळा, वडाळा, अणुशक्ती नगर, चांदिवली या काही मतदारसघांवर काँग्रेस दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. यातील काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 629
जागावाटप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भास्कर जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट…

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.