Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणेश कारखान्याला कर्ज नाकारणाऱ्या जिल्हा बँकेविरोधात सभासदांचा हल्लाबोल, सोमवारी काढणार निषेध मोर्चा
आंदोलन

गणेश कारखान्याला कर्ज नाकारणाऱ्या जिल्हा बँकेविरोधात सभासदांचा हल्लाबोल, सोमवारी काढणार निषेध मोर्चा

शेतकरी, सभासदांच्या अन्नात माती कालविण्याचे काम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०६ ऑगस्ट

राहाता – सलग दुसर्‍या हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेने राजकिय दबावापोटी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे कर्ज नाकारले, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभासद व शेतकर्‍यांच्यावतीने जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले पाटील यांनी दिली.

या आंदोलना बाबतचे निवेदन सर्व संबंधितांना पाठविल्याचे सांगत अ‍ॅड. कार्ले म्हणाले, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला मागील हंगामात जिल्हा सहकारी बँकेने ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते. तसे पत्रही जिल्हा बँकेने कारखान्याला दिले होते. परंतु मंजुर केलेले कर्ज राजकिय सुडबुध्दीने बँकेने नाकारले.

याचा परिणाम म्हणुन त्या काळात ऊसतोड कामगार भरतीसह अनुषंगिक खर्च करता आले नाही. त्यामुळे कारखान्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले. सन २०२४-२०२५ च्या हंगामासाठी गणेश कारखान्याने जिल्हा बँकेकडे ३० कोटी रुपयांचे कर्ज मागणी प्रस्ताव पाठविला. हे कर्ज मिळावे म्हणुन संचालक मंडळ, परिवर्तन मंडळाच्या नेत्यांनी अनेक वेळा बँकेशी संपर्क करुन व प्रत्यक्ष भेटून सदर कर्ज प्रस्ताव मंजुर करण्यासाठी विनंती केली. परंतु जिल्हा बँक सदर प्रस्तावाच्या मंजुरीसाठी चालढकल करत आहे.

सदर प्रस्ताव मंजुर करु नये म्हणुन काही बड्या राजकिय नेत्यांचा दबाव जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनावर असल्याने व्यवस्थापन मंडळ निर्णय घेत नाही. व्यवस्थापन मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना सभासद, कामगार व इतर घटकांचे मोठे अर्थिक नुकसान होणार आहे. जिल्हा बँकेने इतर कारखान्यांना कर्ज वितरण केले आहे. त्यास आक्षेप नाही. परंतु गणेशचे बॅलन्सशिट इतर कारखान्याच्या तुलनेत चांगले असताना केवळ गणेश बंद पडावा, या राजकिय हेतुने काही राजकिय मंडळी सभासद, कामगार, शेतकरी यांच्या अन्नामध्ये माती कालविण्याचा प्रयत्न करत आहे.

एकूणच संबधित राजकिय पुढार्‍यांनी व बँक व्यवस्थापनाने गणेश कारखान्याचा कर्ज प्रस्ताव प्रकरण मान्यतेस आजतागायत मंजुरी दिली नाही. त्याच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) राहाता येथील विरभद्र मंदिरापासुन मोर्चाला सुरुवात करुन जिल्हा बँकेच्या राहाता येथील शाखेवर सदरचा मोर्चा नेण्यात येवून बँकेस कारखान्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. कार्ले पाटील यांनी सांगितले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,258
आंदोलन गणेश कारखाना जिल्हा बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.