Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाच मागणीची हद्दच झाली… लाचेत मागितले दोन कोटी रुपये, ७५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना पकडले; तिघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

लाच मागणीची हद्दच झाली… लाचेत मागितले दोन कोटी रुपये, ७५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना पकडले; तिघांवर गुन्हा दाखल

वरकमाईची चटक भोवली
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 7, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०७ ऑगस्ट 

चार मजली इमारतीचे दोन मजले अवैध असल्याने त्यावर निष्काशनाची कारवाई न करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या व त्यापोटी ७५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित अधिकाऱ्यासह आणखी दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदार अशोक तारी, (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, अंधेरी पूर्व मुंबई), मोहम्मद शहजादा मोहम्मद यासिन शहा (प्रॉपर्टी इस्टेट एजंट) आणि प्रतीक विजय पिसे (कंत्राटदार) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघा आरोपींची नावे आहे. मंगळवारी (६ ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली असून या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ७ आणि ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाच्या मुंबई युनिटने ही यशस्वी कारवाई केली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची मुंबईतील जे. बी. नगरमधील शहीद भगतसिंग कॉलनीत प्लॉट क्रमांक १९१, १९२ मध्ये स्वतःच्या मालकीचे चार मजले इमारत आहे. इमारतीवरील दोन मजले अवैध असून त्यावर निष्काशन कारवाई न करण्यासाठी तसेच नियोजित प्लॉट क्रमांक १९३, १९४ खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करणे असे सर्व मिळून दोन करोड रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर तक्रारदाराने मुंबई लाच लुचपत विभागाकडे या ३१ जुलै २०२४ रोजी संदर्भात तक्रार केली. त्यानंतर लाच लुचपत विभागाने मंगळवारी (६ ऑगस्ट) केलेल्या पडताळणीमध्ये आरोपीने दोन करोड रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता ७५ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लचपत विभागाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावला होता.

कारवाईदरम्यान निर्देशित अधिकारी मंदार अशोक तारी याच्या सांगण्यावरून मोहम्मद शहजादा मोहम्मद यासिन शहा (प्रॉपर्टी इस्टेट एजंट) आणि प्रतीक विजय पिसे (कंत्राटदार) यांना ७५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तिघाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले पुढील तपास करत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,594
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.