Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहाय्यक सरकारी वकील महिलेला लाच घेताना पकडले
गुन्हेगारी

सहाय्यक सरकारी वकील महिलेला लाच घेताना पकडले

लष्कर कोर्टात कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १५ ऑगस्ट 

गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली कार न्यायालयातून परत मिळवून देण्यासाठी आणि पुण्यात मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी वकील महिलेला लाच लुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

अंजला नलिनी कमलाकर नवगिरे (वय ५४ वर्ष, पुणे) असे लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता महिलेचे नाव असून पुणे लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध जून २०२४ मध्ये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तक्रारदाराच्या नावावर असलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली कार परत मिळावी यासाठी तक्रारदार महिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्ट, पुणे यांच्या न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर अर्जाबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारी अभियोक्ता यांना दिले होते.

त्यामुळे तक्रारदार महिलेने सरकारी वकील अंजला नवगिरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्या असता नवगिरे यांनी तक्रारदार महिलेला गाडी परत मिळवून देण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत म्हणणे सादर करण्याकरिता व गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार महिलेने पुणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत नवगिरे यांच्या विरोधात तक्रार केली होती.

लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक सरकारी अभियोक्ता अंजला नवगिरे यांनी लाच मागितल्याचे दिसून आले. त्यामुळे लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी लावलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवगिरे यांना लष्कर कोर्टातील त्यांच्या कार्यालयात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,357
लाच लुचपत लाचखोरी सरकारी वकील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.