शुक्रवार, १६ ऑगस्ट
मठाधिपदी सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटाच्या महंतावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेरमध्ये दाखल करण्यात आलेला हा गुन्हा तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लखमीपुरा येथील अहमद रझा युनूस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी शेख यांच्या टिपू सुलतान एक योद्धा युवा मंच संगमनेर या व्हाट्सअप ग्रुप वर गंगागिरी महाराज मठाधिपती सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र गोदावरी तांबे यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे विरुद्ध नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावातील प्रवचनात वक्तव्य केले होते.
या वक्तव्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले असून संगमनेरमध्ये देखील गुरुवारी रात्री एका ठिकाणी मोठा जमा जमा झाला होता. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०२, ३५३(२) नुसार हा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.



