Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकजुटीने लढवून युतीच्या सत्तेला पायउतार करणार, महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवारांचा वज्र निर्धार
राजकारण

एकजुटीने लढवून युतीच्या सत्तेला पायउतार करणार, महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवारांचा वज्र निर्धार

षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यातल्या युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे, अशा परिस्थितीत आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे, असा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला पवार मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रातल्या मोदी सरकारची लक्तरं काढली.

या निर्धार मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, सगळे जण बोलले की राज्याची निवडणूक तीन महिन्यांवर आहे. पण राज्याची निवडणूक केवळ दोन महिन्यांवर आहे. त्यामुळे आता आपल्याकडे दोन महिन्यापेक्षाही कमी दिवस आहेत. या कमी दिवसांमध्ये मविआतील तिन्ही पक्षांनी आणि मित्रपक्षांनी देखील सामान्य लोकांमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या परीवर्तनाचा विचार लोकांमध्ये रुजवला पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. हे सत्ताधारी कशा पद्धतीने चुकीच्या रितीने सत्तेचा वापर करता आहेत, हे लोकांना जाऊन सांगावं लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

राज्य सरकारने एक नवीन कायदा आणण्याचा निर्णय घेतला होता. जन सुरक्षा कायदा. तो विधानसभेत मांडला. आपल्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभा अध्यक्षांकडे मागणी केली की हा कायदा थांबवा. विरोधकांमुळे हा कायदा थांबविण्यात आला. या कायद्यानुसार तुम्ही रस्त्यात आंदोलन केलं तर तुम्हाला पाच ते सात वर्ष तुरुंगात ठेवलं जाणार होतं. साधी निदर्शनं केली तरी तुरुंगवास होणार होता. एका माणसाने असो की २५ लोकांनी आंदोलन केले तरी तुरुंगात टाकणार होते.

निदर्शने करण्याचा लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतला जाईल. पण विरोधी पक्ष जागरूक होता. म्हणून कायदा थांबला, असं यावेळी शरद पवार म्हणाले. राज्यातील युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे, असं म्हणत शरद पवारांनी याही परिस्थितीला तोंड द्यायचं आहे असं कार्यकर्त्यांना धीर दिला. निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे. आम्ही तिघेही खात्री देतो की, डावे, उजवे, मविआतील सर्व घटक पक्षांना सन्मानाने सोबत घेऊन निवडणुकीला एका विचारधारेने सामोरं जाऊ आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं काम एकजुटीने करू. या प्रयत्नात तुमचा हातभार हवा आहे, असं आवाहन पवार यांनी केलं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 511
महाविकास आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.