Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील पोलीस पाटील नेहे यांना राज्यपाल पुरस्कार! पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमधील पोलीस पाटील नेहे यांना राज्यपाल पुरस्कार! पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

सावरगाव तळचे पोलीस पाटील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १८ ऑगस्ट 

महामहीम राज्यपालांच्यावतीने देण्यात येणारा “विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार” संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील कामगार पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देत गौरविण्यात आले.

अहमदनगरच्या जिल्हा मुख्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते.

सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. सावरगावतळ येथील पोलीस पाटील गोरक्ष रामनाथ नेहे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सेवाकाळात गावामध्ये लोक कल्याणकारी राज्य व सामाजिक न्यायाची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासनाच्या अनेक योजना गावपातळीवर लोकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहचवून त्यांची अंमलबजावणी केली आहे. ई पीक पाहणी प्रकल्प गावात यशस्वी केले. महसूल व कृषी विभागाच्या अनेक जन कल्याणकारी योजनांची गावात यशस्वी अंमलबजावणी केली.

पाणी फौंडेशन लोकचळवळीच्या माध्यमातून गावात जलसंधारणचे मोठे काम उभे केले. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, ग्रामविकास याचबरोबर गावात कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी कार्य केले. कोविड साथीच्या महामारीच्या काळात गाव सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले.

पोलीस पाटील म्हणून करत असलेल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही ते अत्यंत प्रभावी कार्य करत आहेत. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 868
गोरक्ष नेहे पुरस्कार पोलीस पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.