Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभेआधीच आमदार बाळासाहेब थोरातांवर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीवर फेरनिवड, चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका
राजकारण

विधानसभेआधीच आमदार बाळासाहेब थोरातांवर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीवर फेरनिवड, चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका

चार दशकांपासून सलगपणे संगमनेरचे आमदार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2024Updated:18/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १८ ऑगस्ट

काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पक्षीय भूमिका बजावणारे संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवत काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड केली आहे. यामुळे थोरात यांच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा संगमनेरचे महत्व अधोरेखित झाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थोरात यांच्या निवडीची माहिती दिली.

स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होत विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चार दशके राजकारणात असलेल्या थोरात यांनी राष्ट्रीय समित्यांसह राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, रोहयो, खार जमीन, राजशिष्टाचार अशा आठ विभागांची जबाबदारी सांभाळताना या सर्व विभागांना लोकाभिमुख केले. महसूलमंत्री असताना ऑनलाईन सातबारा, आठ अ तसेच विद्यार्थ्यांना शाळेतच ८० लाख दाखले देण्याचा विक्रम केला होता. शिक्षणमंत्री काळात बेस्ट ऑफ फाईव्ह तर कृषी मंत्री काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.

त्यांच्या कामाची दखल घेत २०१८ मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले. यानंतर हिमाचल प्रदेशच्या निरीक्षकपदीही थोरात यांनी काम केले. २०१९ मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर त्यांची निवड झाली होती. तर जुलै २०१९ मध्ये पक्ष अत्यंत अडचणीत असताना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी ४४ आमदार निवडून आणले. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये मोलाचा वाटा उचलला.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूलमंत्रीपद सांभाळताना ई – पीक पाहणीसह शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. याच काळामध्ये निळवंडे कालव्यांना अत्यंत गती देताना कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाचे स्वप्न पूर्ण केले. राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम करताना संगमनेर तालुका सर्वांगीण विकासातून राज्यात अग्रगण्य बनवला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळताना त्यांनी महाविकास आघाडीला ३१ जागांवर मोठे यश मिळवून दिले. शांत, संयमी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आमदार बाळासाहेब थोरातांची अत्यंत लोकप्रिय असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेसच्या सर्वोच्च असलेल्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, के. सी. वेणूगोपाल, पी. चिदंबरम अशा राष्ट्रीय नेत्यांचा समावेश असलेल्या कमिटीत आता थोरात पुन्हा काम पाहतील.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 932
काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटी फेर निवड बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.