Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची मागणी करण्यासाठी संगमनेर शिवसेनेचे आंदोलन
आंदोलन

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची मागणी करण्यासाठी संगमनेर शिवसेनेचे आंदोलन

लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2024Updated:21/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २१ ऑगस्ट 

बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा राज्यभर निषेध सुरू असताना संगमनेरमध्ये देखील शिवसेना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या’, अशा घोषणा देत राज्याच्या गृह खात्याचा निषेध करण्यात आला.

महिला संपर्कप्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेरमध्ये बुधवारी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी यावेळी बदलापूर अमानवीय घटनेचा निषेध करत नराधम आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. तसेच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा घोषणा देत धिक्कार करण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कोपर्डी प्रकरण, नवी मुंबई प्रकरण, बदलापूर प्रकरण आणि राज्यातील विविध अमानवीय घटनांचा उल्लेख केला. बदलापूर प्रकरणी पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केली? संबंधित संस्थाचालक कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे? बदलापूर प्रकरणी आंदोलनासाठी रस्त्यावर आलेल्या आंदोलकांवर पोलिसांमार्फत लाठी चार्ज का करण्यात आला? असे अनेक प्रश्न आंदोलकांनी यावेळी उपस्थित केले.

बदलापूर घटनेसह राज्यात घडत असलेल्या अमानवीय प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्याने राजकीय दबाव जाणवत आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद ठरत असल्याने गृह खात्याचे प्रमुख असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.

महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शितल हासे, उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, शहर प्रमुख संगीता गायकवाड, उप तालुका प्रमुख रेणुका शिंदे, वैशाली वडतल्ले आदी महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले.

यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे, गोविंद नागरे, फैसल सय्यद, पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंखे, आरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), वैभव अभंग, वेणुगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे, भाई शेख, प्रकाश गायकवाड, शरद कवडे, आसिफ तांबोळी, निलेश गुंजाळ, अक्षय गाडे, अल्ताफ शेख, इमरान सय्यद, इरफान सय्यद, प्रशांत खजुरे, अनिल खुळे, त्रिलोक कतारी, संकेत घोडेकर, रोमन सय्यद, नारायण पवार, प्रकाश चोथवे, माया राठोड, वर्षा मंडलिक, रंजना पवार, सुगरिता खीची, काजल राठोड, भाऊसाहेब बोराडे, सदाशिव हासे, विलास शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 714
अमर कतारी आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.