Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तिने दोन लाखाची सुपारी देत त्याचा काढला काटा, पोलीस पुत्राच्या हत्येची उकल; महिलेसह इतक्या आरोपींना पकडले
गुन्हेगारी

तिने दोन लाखाची सुपारी देत त्याचा काढला काटा, पोलीस पुत्राच्या हत्येची उकल; महिलेसह इतक्या आरोपींना पकडले

पैशांच्या लोभापायी त्यांचा गुन्ह्यात सहभाग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २३ ऑगस्ट

नाशिक – नाशिकच्या पंचवटीत पोलीस पुत्राच्या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चौघांना पकडले असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे.

पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे २५ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव आहे.

पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे (२५) आणि भावना कदम (३९) यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी पहाटे बोलविण्यात आले. त्या ठिकाणी संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन गगनची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पंचवटी विभागाच्या सहायक आयुक्त पद्मजा बढे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले. संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला.

निरीक्षक कड यांना संशयित हे अशोकनगर परिसरातील असल्याचे समजले. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

पथकांनी संकेत रणदिवे (२०), मेहफुज सय्यद (१८), रितेश सपकाळे (२०) तिघेही रा. अशोकनगर तसेच गौतम दुसाने (१८, रा. गंगापूर रोड) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता गगन याच्या हत्येसाठी भावना कदम (रा. म्हसरूळ) हिने दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भावना हिलाही ताब्यात घेतले.

संशयित महिला विवाहित

भावना कदम विवाहित असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या माध्यमातूनच त्यांची संकेत, मेहफुज, रितेश आणि अन्य लोकांशी ओळख झाली. चारही मुले सामान्य कुटुंबातील असून सातपूर औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत. केवळ पैशांच्या लोभापायी त्यांनी गुन्ह्यात सहभाग घेतला. हत्येचा कट रचल्यावर भावनाने गगन याला नेहमीच्या जागेवर भेटण्यासाठी बोलविले. त्या ठिकाणी संशयितांनी गगनची हत्या केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,432
खून नाशिक पंचवटी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.