शुक्रवार, २३ ऑगस्ट
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने दिले आहे.

बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बंदच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने धक्का देणारा निर्णय देताना बंद बेकायदेशीर ठरवला आहे.
मुंबई हायकोर्टाने निकाल देतांना म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.


