Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणेशोत्सव ईद-ए-मिलादसह इतर सण शांततेत साजरे करा, गणेश मंडळांना पारितोषिके देणार : जिल्हाधिकारी सालीमठ
प्रशासन

गणेशोत्सव ईद-ए-मिलादसह इतर सण शांततेत साजरे करा, गणेश मंडळांना पारितोषिके देणार : जिल्हाधिकारी सालीमठ

उत्सवादरम्यान काही घटना घडल्यास त्याची माहिती देण्यासाठी डायल ११२ चा वापर करा : एस.पी. ओला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २४ ऑगस्ट 

गणेशोत्सव ईद-ए-मिलादसह आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत व एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, म‍हापालिका आयुक्‍त डॉ. यशवंत डांगे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भरती यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी सालीमठ म्‍हणाले, सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक, संस्कृतीचे जतन करणारे व ध्वनी प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, अशा मंडळांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सण, उत्सवादरम्यान रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीटलाईट यासह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला म्हणाले, गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पहाणी करण्यात येऊन त्या ठिकाणी असलेल्या समस्यांची सोडवणूक केली जाईल. एक खिडकी योजनेतून गणेशमंडळांना परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरून मिरवणुकीदरम्यान कुठलाही अडथळा अथवा अपघात होणार नाही.

पोलीस प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, आवश्यक ठिकाणी बॅरीकेटींग करण्याबरोबरच पेट्रोलिंगही करण्यात येईल. उत्सवादरम्यान काही घटना घडल्यास त्याची माहिती देण्यासाठी डायल ११२ चा वापर करा. उत्सवादरम्यान मंडळांनी त्यांचे स्वयंसेवक २४ उपलब्ध राहतील याची व्यवस्था करावी तसेच सण शांततेत साजरे होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी उपयुक्त सुचना केल्‍या.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 639
गणेशोत्सव राकेश ओला शांतता समिती बैठक सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.