Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » येत्या शनिवार, रविवारी या योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष कॅम्प घेण्याचे नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
प्रशासन

येत्या शनिवार, रविवारी या योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष कॅम्प घेण्याचे नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

तालुकास्तरीय कार्यालयात योजना कक्ष सुरू करा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २५ ऑगस्ट

अहमदनगर – मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे. तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, क्षेत्रफळाने व लोक संख्येच्यादृष्टीने आपला जिल्हा मोठा आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी मोठा वाव आहे. या दोन्ही योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असुन या योजनेचा शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालयामध्ये योजना कक्ष सुरु करण्यात यावा. या कक्षातुन लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्याबरोबरच त्यांचे लाभासाठीचे फॉर्म भरुन घेण्यात यावेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती जिल्ह्यातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या दोन्ही योजनांची शहरी व ग्रामीण पातळीवर व्यापक स्वरुपात जागृती करा. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योजनेची माहिती असलेले बॅनर, पोस्टर लावण्यात यावेत. गत शनिवार व रविवारी झालेल्या विशेष कँपमध्ये सर्वच अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये आजपर्यंत १ लक्ष ३२ हजार ३४२ लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले असुन मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये २ हजार ८०६ अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. परंतू यापेक्षाही अधिक चांगले व अधिक गतीने काम करण्याची गरज असुन अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक या तालुका व ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या घटकांची मदत घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी केल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले, जिल्ह्यात दोन दिवसीय शिबीरामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे चांगले काम झाले आहे. परंतू एवढ्यावर समाधानी न राहता आपला जिल्हा या योजनांच्या अंमबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर राहील यादृष्टीने काम करा. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित व समन्वयाने काम करत या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात यावा.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 737
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.