Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विश्व हिंदू परिषद हिरक महोत्सवानिमित्त रविवारी संगमनेरात भव्य हिंदू संमेलन, आज दहीहंडी व लहान मुलाच्या वेशभुषासाठी आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह वाटप
सामाजिक

विश्व हिंदू परिषद हिरक महोत्सवानिमित्त रविवारी संगमनेरात भव्य हिंदू संमेलन, आज दहीहंडी व लहान मुलाच्या वेशभुषासाठी आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह वाटप

जीवदया गोशाळेला केली मदत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २८ ऑगस्ट

विश्व हिंदू परिषद हीरक महोत्सवानिमित्त बजरंग दलाच्यावतीने संगमनेरमध्ये भव्य हिंदू संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस यावर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहे भारतासह संपूर्ण विश्वातील हिंदूंची सेवा सुरक्षा व संस्कार करणे हे ध्येय समोर ठेवून विश्व हिंदू परिषद अखंड कार्य करीत आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी आंदोलन, न्यायालयीन लढा आणि मंदिराच्या निर्माण पर्यन्त चे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे. अनेक मोठमोठ्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेने यशस्वीपणे आपली भूमिका घेतली आहे. आणि यापुढेही हिंदू हिताचे कार्य अखंडितपणे चालू राहणारच आहे.

रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे मार्गावरील शेती संघ पेट्रोल पंपासमोरील मालपाणी लॉन्स येथे डॉ. प्रवीण पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य हिंदू संमेलन होणार आहे.

या संमेलनात पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प. भागवताचार्य माधवदास राठी महाराज, महावीर मिशन ट्रस्ट, भाग्यनगर अध्यक्ष राष्ट्रसंत निलेशजी चंद्रजी मुनी, प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संचालीका ब्रह्मकुमारी अनिता दीदी, वारकरी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर वेदमुर्ति ह.भ.प. व्यंकटेश महाराज सोनवणे, धर्माचार्य विजय बाळाराजपुरकर महानुभाव (भोर महाराज), पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, नगर विभाग मंत्री सुनिल खिस्ती आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

गत सोमवारी (२६ ऑगस्ट) सायखिंडी फाटा येथे असलेल्या जीवदया गोशाळेमध्ये गोवंश जनावरांना चारा वाटप करण्यात आले. तसेच स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले असून ११०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी जीवदया गो-शाळेला संगमनेर प्रखंडाच्या पदाधिकाऱ्यांनी ११,०००/- रुपयांची मदत केली.

आज बुधवारी दत्त मंदिरासमोर दहीहंडी…

बुधवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजता बस स्थानकातील दत्त मंदिरासमोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी कार्यक्रमादरम्यान लहान मुलांच्या वेशभूषेसाठी आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्ह वाटप केले जाणार आहे.

असे कार्यक्रम विश्व हिंदू परिषद हीरक महोत्सवानिमित्त बजरंग दलाने आयोजित केले असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने विहिंप संगमनेर प्रखंड बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर, विहिंप शहराध्यक्ष श्रीकांत मोरे, उपाध्यक्ष शेखर वामन, कार्याध्यक्ष ओम बिल्लाडे, प्रखंड मंत्री कृष्णा डंबीर, कोषाध्यक्ष प्रसाद थोरात, सहमंत्री वैभव मेहेत्रे, सहमंत्री चिराग साहु, बजरंग दल शहर संयोजक ओंकार भालेराव, मातृशक्ती संयोजिका संगीता बैरागी, दुर्गावाहिनी संयोजिका ॲड. सोनाली बोटवे यांनी दिली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,049
कुलदीप ठाकूर बजरंग दल विश्व हिंदू परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी…

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.