Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संगमनेरमध्ये सरकार विरोधात आंदोलन
आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संगमनेरमध्ये सरकार विरोधात आंदोलन

राज्यात संतापाची लाट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बेजबाबदार शासनाला जनतेने शिक्षा द्यावी – माजी आमदार डॉ. तांबे

मालवणची घटना दुर्दैवी व वेदनादायी – डॉ. जयश्री थोरात

बुधवार, २८ ऑगस्ट

संगमनेर – महाराष्ट्रासह देशवासीयांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने राज्यभरात भ्रष्ट सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. बुधवारी संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकार्‍यांना या संदर्भातील निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

संगमनेरकर नागरिक, शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेले सर्वजण भ्रष्ट भाजप सरकार विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयात आले होते.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री व गजेंद्र अभंग, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख गोविंद नागरे, पथविक्रेता समितीचे दीपक साळुंखे, अमोल डुकरे, रंगनाथ फटांगरे, राष्ट्रवादीचे बी. जी. देशमुख, अर्चना बालोडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • अत्यंत बेपर्वाही असलेले हे सरकार बेताल वक्तव्य करत आहेत…

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि संताप जनक आहे. असे असताना शासन मात्र ही जबाबदारी एकमेकांवर ढकलाढकली करत आहेत. अत्यंत बेपर्वाही असलेले हे सरकार बेताल वक्तव्य करत आहेत. जनतेने या सरकारला कडक शिक्षा दिली पाहिजे. शिक्षणमंत्री सुद्धा या संवेदनशील विषयावर बेजबाबदार वक्तव्य करतात, हे अत्यंत चिंताजनक असून या महाराष्ट्र सरकारचा आपण निषेध करत आहोत. – डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार

  • सरकारने नौदलावर जबाबदारी ढकलने दुर्दैवी, महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्रासाठी वेदनादायी…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. खरे तर महाराजांनी उभारलेले गड किल्ले हे चारशे वर्षापासून तसेच आहेत आणि या भ्रष्टाचारी सरकारने उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. यामधील ठेकेदार आणि भ्रष्टाचारांना कडक शिक्षा झाली पाहिजे याचबरोबर या सरकारने या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे. दुर्दैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा नौदलावर या घटनेची जबाबदारी ढकलतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. नौदल हे सागरी किनाऱ्याचे रक्षण करते मात्र त्यांच्यावर आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे चुकीचे आहे. सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. – डॉ. जयश्री थोरात.

  • राज्यातील जनतेत संताप…

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानकपणे कोसळणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान देखील आहे. या घटनेमुळे शिवप्रेमी मध्ये संताप निर्माण झाला आहे. घटनेची जबाबदारी सरकार नौदलावर ढकलत आहे. या प्रकाराचा निषेध करत राज्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारने दक्षता घेण्याची गरज आहे. – साथी विनायक माळवे, प्रदेश सचिव जनता दल (सेक्युलर)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,158
अमर कतारी छत्रपती शिवाजी महाराज जयश्री थोरात पुतळा कोसळला विनायक माळवे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.