Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर पोलिसांना शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडला, गाळ्यातील मटक्याचे आकडे घेणाऱ्यावर कारवाई बाकीच्यांचे काय?
गुन्हेगारी

अखेर पोलिसांना शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडला, गाळ्यातील मटक्याचे आकडे घेणाऱ्यावर कारवाई बाकीच्यांचे काय?

'महाराष्ट्र संवाद न्यूज'चे आहे लक्ष!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2024Updated:28/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २८ ऑगस्ट

अवैध धंद्यासाठी बहुचर्चित असलेल्या शक्तिमान टॉवरचा अखेर संगमनेर शहर पोलिसांना पत्ता सापडला असून पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचच्या (डीबी) कर्मचाऱ्यांनी येथील एका गाळ्यात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सोमवारी साडेसहा वाजता छापा टाकला. कल्याण मटक्याचे आकडे घेणाऱ्या एकाला पोलीस पथकाने पकडत त्याच्यावर कारवाई केली, मात्र याचवेळी येथे सुरू असलेल्या अन्य अवैध धंद्यांकडे पोलीस पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

राज्यात सुसंस्कृत म्हणून पुढे येत असलेल्या संगमनेरला गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा कलंक लागला असून गल्लोगल्ली हे धंदे राजरोसपणे रस्त्यांवर सुरू आहे. पोलिसांसह अन्य संबंधित सर्वच विभागांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील सामील असल्याने पोलीस कारवाई होत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.

‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने गेल्या काही दिवसांपासून यावर प्रकाश टाकला आहे. शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना देखील हे धंदे थांबविण्यात अपयश आल्याचे ‘महाराष्ट्र संवाद न्यूजने’ दोन दिवसांपूर्वीच्या वृत्तात म्हटले होते. प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताची दखल घेत पोलीस निरीक्षक महाजन यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन टीम मध्ये काम करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अजित कुऱ्हे, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे व रोहिदास शिरसाठ यांच्या पथकाने शक्तिमान टॉवर्स बिल्डिंग मधील एका गाळ्यात छापा टाकला असता तेथे केशव गजानन हूजबंद नावाची व्यक्ती आकडेमोड करताना, लोकांकडून पैसे घेताना कल्याण मटका नावाचा जुगार चालविताना आढळून आली.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मटक्यासाठीचे साहित्य व साडेआठशे रुपयांची रोकड ताब्यात घेतली. कारवाई करण्यात आलेल्या पंटरने पोलिसांना मटका अड्डा चालविणाऱ्या मालकाचे नाव न सांगता आपण स्वतःच्या फायद्यासाठी मटका खेळत व खेळवीत असल्याचे सांगितले असले तरी या मटका व्यवसायाचे खरे सूत्रधार सर्वांनाच माहिती आहे. पोलीस तपासात आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे समोर येईल.

दरम्यान या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल अजित कुर्हे यांच्या फिर्यादीवरून आरोपी केशव हूजबंद याच्या विरोधात गु.र.न. ७२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी शक्तिमान टॉवरमध्ये मटका चालकावर कारवाई केली असली तरी या टॉवरमध्ये सुरू असलेल्या अन्य अवैध धंद्यांकडे मात्र अद्यापही लक्ष दिले नसल्याचे दिसते. राजकीय पक्षाच्या आडून अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,019
अवैध व्यवसाय इम्पॅक्ट मटका कारवाई शक्तिमान टॉवर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.