Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

आज, शुक्रवार २४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुधारित कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला मतदारांची संख्या वाढली; बघा विधानसभानिहाय मतदार संख्या
निवडणूक

सुधारित कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला मतदारांची संख्या वाढली; बघा विधानसभानिहाय मतदार संख्या

मतदार यादी त नाव आहे की नाही या वेबसाईटवर करा चेक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 30, 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट 

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत ५३ हजार ८३० मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ३३ हजार ५१४ पेक्षा अधिक आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमाआधी ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ३६ लाख ७३ हजार ९६९ होती. प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या ३७ लाख २७ हजार ७९९ एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार २८७ पुरूष आणि ३१० महिला असे एकूण ९ हजार ६८७ सैनिक मतदार आहेत तर इतर मतदारांची संख्या २०६ एवढी आहे.

लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, प्रक्षेपित लोकसंख्येनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करुन घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरील मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहीम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले आहे.

शेवगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार….

अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघात १ लाख ९२ हजार ४४७ पुरूष आणि १ लाख ७६ हजार २९० महिला असे सर्वाधिक ३ लाख ६८ हजार ७४३ मतदार आहेत.  

अकोले विधानसभा मतदारसंघात १ लाख ३७ हजार ६३६ पुरुष, १ लाख २५ हजार ३०५ महिला असे एकूण २ लाख ६२ हजार ९४२ मतदार आहेत. 

संगमनेरमध्ये १ लाख ४६ हजार ६२३ पुरूष, १ लाख ३८ हजार ४१५ महिला असे एकूण २ लाख ८५ हजार ४० मतदार आहेत.

शिर्डीमध्ये १ लाख ४७ हजार ३७८ पुरूष, १ लाख ४० हजार ८३० महिला, असे एकूण २ लाख ८८ हजार २१६ मतदार आहेत. 

कोपरगावमध्ये १ लाख ४४ हजार ६०६ पुरूष, १ लाख ४० हजार ८८९ महिला असे एकूण २ लाख ८५ हजार ५०१ मतदार आहेत. 

श्रीरामपुरमध्ये १ लाख ५४ हजार ३१० पुरूष, १ लाख ५० हजार ९५० महिला असे एकूण ३ लाख ५ हजार ३२६ मतदार आहेत. 

नेवासामध्ये १ लाख ४४ हजार ८६० पुरूष, १ लाख ३४ हजार ८३० महिला असे एकूण २ लाख ७९ हजार ६९४ मतदार आहेत. 

राहुरीमध्ये १ लाख ६५ हजार २७५ पुरूष, १ लाख ५२ हजार १८८ महिला असे एकूण ३ लाख १७ हजार ४६४ मतदार आहेत.

पारनेरमध्ये १ लाख ७८ हजार ७५३ पुरूष, १ लाख ६७ हजार २१४ महिला असे एकूण ३ लाख ४५ हजार ९७० मतदार आहेत. 

अहमदनगर शहरमध्ये १ लाख ५८ हजार ४३० पुरूष, १ लाख ५२ हजार ८०७ महिला असे एकूण ३ लाख ११ हजार ३४४ मतदार आहेत. 

श्रीगोंदामध्ये १ लाख ७४ हजार ३८३ पुरूष, १ लाख ६० हजार २८० महिला असे एकूण ३ लाख ३४ हजार ६६५ मतदार आहेत.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ७९ हजार ६५८ पुरूष, १ लाख ६३ हजार २३६ महिला असे एकूण ३ लाख ४२ हजार ८९४ मतदार आहेत. 

वयोवृद्ध मतदारांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष भेटीवर भर –

घरोघरी पडताळणी मोहिमेत नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी मयत मतदार यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांच्या बाबतीत वारंवार आढावा घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. जागेवर न आढळणाऱ्या आणि स्थलांतरीत मतदारांची केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करुन वगळणी करण्यात आली. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत एकूण १६ हजार ५१६ मतदारांची वगळणी करण्यात आली.

मतदार नोंदणी सुरूच राहणार…

अंतिम यादी प्रसिद्धीनंतरही सततचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १ जुलै २००४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांची नाव नोंदणी सुरू राहील. नवीन मतदार नाव नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर नमुना क्र.६ उपलब्ध आहे. मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in आणि www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

वोटर्स हेल्पलाईन ॲपचादेखील नाव नोंदणी व नाव शोधण्यासाठी उपयोग करता येईल. मतदार नोंदणीचे अर्ज जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातही उपलब्ध आहेत. मतदार नोंदणीसाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) अथवा तहसिल कार्यालयात संपर्क साधावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींद्वारे मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 613
निवडणूक मतदार यादी सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

June 17, 2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

By अनंत पांगारकरJuly 24, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांच्या वतीने शनिवारी, (२५ जुलै) तक्रार निवारण दिनाचे आयोजन…

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

आज, शुक्रवार २४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 24, 2026

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.