Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, ६ लाखाचे तीन टन गोमांस आणि ३ लाखाची गोमांस वाहतूक करणारी पिकअप जप्त!
गुन्हेगारी

कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, ६ लाखाचे तीन टन गोमांस आणि ३ लाखाची गोमांस वाहतूक करणारी पिकअप जप्त!

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची कारवाई
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 1, 2024Updated:September 1, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. ०१ सप्टेंबर

संगमनेर – कायद्याची पायमल्ली करत, राजरोसपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाखाची पिकअप जीप जप्त केली आहे. गेल्या काही दिवसातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार झाला आहे. सादिक मुनीर शहा (वय २५ वर्ष, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपीचे नाव असून कारवाई केलेल्या कत्तलखान्याचा चालक असलेला कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा. भारतनगर, संगमनेर) हा फरार झाला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

अधिक माहिती अशी, शहरातील जमजम कॉलनी गल्ली क्रमांक ५ मध्ये असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी लगेचच पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना कत्तलखान्यावर कारवाई करण्यास सांगितले.

दाभाडे, सारबंदे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कमरआली गुलाम सौदागर (कुरेशी) याच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन खात्री केले असता वाड्याच्या बाहेरच (MH 03 EG 5163) या टाटा इंट्रा पिकअप गाडीमध्ये सुमारे १००० किलो गोमांस भरले असल्याचे आढळून आले. तसेच वाढत पाहणी केली असता तेथे २००० किलो वजनाचे गोवंश जातीचे मांस मिळून आले. पोलिसांनी तेथे पकडलेल्या सादिक मुनीर शहा याने सदरचा माल हा कमरअली गुलाम जिलानी सौदागर याचा असल्याची माहिती पोलिसांना दिली.

कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाख रुपये किमतीची पिकप जीप असा एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 4,316
कत्तलखाना कारवाई सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

अहिल्यानगर | प्रतिनिधी: येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी (…

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.