Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले – खासदार प्रणिती शिंदे
सामाजिक

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले – खासदार प्रणिती शिंदे

'इंदिरा महोत्सव' शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/09/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर

संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे.

संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, महोत्सवाच्या आयोजक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख, प्रभावती घोगरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, व्याख्याते गणेश शिंदे, केशव कांबळे, वंदना पाटील, मनीषा कटके, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे, भावना बच्छाव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिंदे म्हणाल्या, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका समृद्ध असून येथे महिलांना सन्मान मिळतो आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील इंदिरा महोत्सव हे मोठे व्यासपीठ ठरणार असून महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा हा महोत्सव आहे.

काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिलांना सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. तालुक्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम डॉ. जयश्री थोरात यांनी केले. या तालुक्यातील कामांच्या आदर्श इतरांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाविषयी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिला आरक्षण दिले. त्यातून महिलांना अनेक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनी काम करत असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची ही सुरुवात आहे. संगमनेर देशासाठी देशावरचे ठरेल याकरिता आपण सर्वजण काम करूया. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुरेश कोते यांनीदेखील यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, दुग्ध व्यवसायात या तालुक्यातील महिलांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील प्रत्येक कष्टकरी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आपण काम करत असून गृह उद्योग, रोजगार, प्रशिक्षण याशिवाय महिलांचे आरोग्य याकरिता इंदिरा महोत्सवातून दोन दिवस विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

असे आहे इंदिरा महोत्सवाचे स्वरूप…

महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ५१ कंपन्या या महोत्सवात सहभागी झाल्या असून त्यांनी अनेक महिलांना रोजगारासाठी करारबद्ध केले आहे. याशिवाय पॅनल डिस्कशनमधून रोजगार, स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून महिलांना कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन करत आहे. पंधरा हजार महिलांच्या सहभाग हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 776
इंदिरा महोत्सव जयश्री थोरात दुर्गाताई तांबे प्रणिती शिंदे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.