Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाकं थांबल्याने उडाली दाणादाण, एका दिवसात पंधरा कोटींचा महसूल बुडाला
आंदोलन

ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाकं थांबल्याने उडाली दाणादाण, एका दिवसात पंधरा कोटींचा महसूल बुडाला

औद्योगिक न्यायालयाने आजचा हा अघोषित संप बेकायदेशीर ठरवला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर

विशेष प्रतिनिधी / मुंबई

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य परीवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिलाच दिवस असून याचा एसटीच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

पण यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असून आज २२ हजार ३८९ नियोजित फेऱ्यांपैकी आंदोलनामुळे ११ हजार ९४३ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभर सुमारे ५० टक्के वाहतूक बंद होती.

मुंबई, ठाणे, पालघर विभागातून होणारी आजची कोकणातील जादा वाहतूक सुरळीत चालू आहे. परंतु, उद्या बुधवारी (ता. ०४ सप्टेंबर) जादा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तर, आज दिवसभर मुंबई-पुणे महामार्गावरील ई-शिवनेरी बससेवा देखील व्यवस्थित सुरू आहे. पण उद्या बुधवारी मात्र उर्वरीत एसटी कर्मचारी संघटना या संपात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून यामुळे एसटी सेवा पुर्णतः कोलमडण्याची माहिती आता समोर आली आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी उद्यापासून दीर्घ काळासाठी करार पध्दतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाने चाचपणी सुरू करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

महत्त्वाची बाब म्हणजे औद्योगिक न्यायालयाने आजचा हा अघोषित संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला औद्योगिक न्यायालयाकडून दिले गेले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 615
एसटी संप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.