Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञान वापरल्यास जगाच्या पाठीवर पोहोचाल, इंदिरा महोत्सव रोजगार व स्वयंरोजगारासाठीचा मानबिंदू – आमदार बाळासाहेब थोरात
सामाजिक

मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञान वापरल्यास जगाच्या पाठीवर पोहोचाल, इंदिरा महोत्सव रोजगार व स्वयंरोजगारासाठीचा मानबिंदू – आमदार बाळासाहेब थोरात

दोन दिवसात ३५ हजार महिलांचा सहभाग
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 4, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महोत्सव बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करणारा

दोन दिवसात ३५ हजार महिलांचा सहभाग

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर 

इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. बचत गटाच्या महिलांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल. यासाठी इंदिरा महोत्सव मानबिंदू ठरेल, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेरमध्ये आयोजित इंदिरा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, प्रभावती घोगरे, पौर्णिमा शिरसकर, केशवराव कांबळे, इंद्रजीत थोरात, सह्याद्री उद्योग समूहाचे विलास शिंदे, सत्यजित हंगे, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव म्हस्के, घनश्याम शेलार, शरयू देशमुख, जगन्नाथ घुगरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

थोरात म्हणाले, राजीव गांधींनी महिला आरक्षण विधेयक आणले, त्यातून ३३% आरक्षण महिलांना मिळाले. राज्यात काँग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले, त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले. शासकीय योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा.

घराचा उंबरठा ओलांडून जगात येण्याची तयारी ठेवा. तुमच्या उद्योग व्यवसायाला एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच मदत केली जाईल. संगमनेर तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे असून गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचे चांगले मार्केटिंग केले तर त्या माध्यमातून कुटुंबाला देखील मोठा आर्थिक फायदा होईल. गरीब महिलांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे, यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत.

यावेळी प्रभावती घोगरे, विलास शिंदे, सत्यजित हंगे, दुर्गाताई तांबे, पौर्णिमा शिरसकर, डॉ. जयश्री थोरात यांनी देखील महिलांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयश्री थोरात यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर अर्चना बालोडे यांनी आभार मानले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 555
इंदिरा महोत्सव जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.